

Lawrence Bishnoi
Esakal
मुंबईत टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबाराच्या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुन्हा चर्चेत आलंय. गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून हल्ल्याची जबाबदारी घेणारी पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आली होती. या दाव्याची पडताळणी सध्या पोलीस करत आहेत. याआधीही सलमान खानसह इतर अभिनेत्यांवर हल्ल्याचा प्रयत्न आणि बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातही लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर आलं होतं. सध्या तुरुंगात असूनही लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यात मोठे अडथळे आहेत.