

Why India Selected Jana Gana Mana and Not Vande Mataram Nehrus Original Stand
Esakal
वंदे मातरमला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संसदेत सोमवारी १० तासांची विशेष चर्चा आयोजित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाने या चर्चेला सुरुवात झाली. भारताचं राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम ऐवजी जन गण मन हे गीत ७७ वर्षांपूर्वी स्वीकारण्यात आलं होतं. त्यावेळी अनेक घडामोडी घडल्या होत्या. त्यानंतर झालेल्या चर्चा आणि बैठकीनंतर जन गण मन हे राष्ट्रगीत असेल यावर शिक्कामोर्तब झालं होतं. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वंदे मातरम ऐवजी जन गण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून पसंती दिली होती. त्याबाबतची भूमिका तेव्हा बैठकांमधून त्यांनी मांडली होती.