

Why Trust India Foreign Secretary Answers Tough Questions on PM Modi
Esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युरोप दौऱ्यावर असून नॉर्वेमध्ये पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नॉर्वेच्या मुक्त पत्रकार हेल लिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माध्यम स्वातंत्र्यावरून प्रश्न विचारला होता. दरम्यान, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या प्रेस ब्रिफिंगनंतर भारतीय अधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. तेव्हा पंतप्रधान मोदींना विचारलेल्या प्रश्नाच्या मुद्द्याला धरून एका महिला पत्रकाराने भारतावर आम्ही विश्वास का ठेवावा? भारतात होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाला रोखण्याचं आश्वासन देऊ शकता का? भारतीय पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतील का असे प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी ज़र्ज यांनी सडेतोड उत्तर दिलं. PM Modi Press Question Sparks Debate Foreign Secretary Breaks Silence