
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या वायनाड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारत-चीन तणावाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या वायनाड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भारत-चीन तणावाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनमुळे तणाव आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलताना दिसत नाहीत. कारण देशातील लोकांचे लक्ष चीनने भारताच्या जमिनीवर ताबा मिळवला याकडे जावू द्यायचे नाही.
राहुल गांधींनी म्हटलं की, चीनने भारताच्या 1000 स्क्वेअर किमी जमिनीवर ताबा मिळवला आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे याबद्दल बोलण्यासाठी एकही शब्द का नाही असा प्रश्नही राहुल गांधींना विचारला आहे.
मैं प्रधानमंत्री से सुनना चाहूंगा कि चीन भारतीय क्षेत्र को कब छोड़ेगा। लेकिन मैं आपको इस बात की गारंटी देता हूं कि प्रधानमंत्री में ये बताने की हिम्मत नहीं होगी, प्रधानमंत्री चीन के बारे में एक शब्द नहीं बोलेंगे: प्रधानमंत्री के आज होने वाले राष्ट्र के नाम संबोधन पर राहुल गांधी pic.twitter.com/49vIXtG98w
— ANI_HindiNews (@AHindinews) October 20, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी सायंकाळी 6 वाजता देशाला संबोधित केलं. याबाबत मोदींनी ट्विटरवरून लोकांना माहिती दिली होती. मोदींच्या ट्विटनंतर राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना चीनच्या मुद्द्यावर बोलावं अशी विनंती केली होती.
#WATCH PM चीन का नाम नहीं ले रहे हैं क्योंकि वो नहीं चाहते कि देश के लोगों का ध्यान इस पर जाए कि चीन ने हमारी ज़मीन पर कब्ज़ा कर लिया है। चीन ने हमारी 1200 स्क्वायर किलोमीटर ज़मीन पर कब्ज़ा किया है। PM के पास भारत माता की ज़मीन पर कहने के लिए एक भी शब्द क्यों नहीं है:राहुल गांधी https://t.co/k2tl1QPHsC pic.twitter.com/pwfvURzW5d
— ANI_HindiNews (@AHindinews) October 21, 2020
पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींकडून चीन भारतातून माघार कधी घेणार हे ऐकायचं आहे. मात्र मोदींमध्ये हे सांगण्याची हिंमत नाही. मोदी चीनबद्दल एकही शब्द बोलणार नाहीत.
हे वाचा - भारतीय हद्दीत घुसलेल्या चिनी सैनिकाला रात्री पाठवले परत
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनामुळे आलेलं संकट आणि सध्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना संबोधित केलं. यामध्ये मोदींनी सांगितलं की, लॉकडाउन संपलं तरी कोरोना अद्याप गेलेला नाही. सध्या सणाचा उत्साह सगळीकडे आहे. यावेळी काळजी घ्या आणि जबाबदारीने वागा. बेजबाबदारपणामुळे तुमचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्या असं आवाहनही मोदींनी केलं.