

Why Did Narendra Modi Make This Big Appeal
Esakal
PM Modi Urges Indians to Avoid Gold Buying and Foreign Travel इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात उर्जा संकट निर्माण झालंय. यामुळे इंधनासह इतर अनेक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतालाही याचा फटका बसताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याचा काळ संकटाचा असून देशहितासाठी आपल्याला कर्तव्य पार पाडलं पाहिजे असं म्हणत इंधन बचत, खाद्यतेलाचा कमी वापर, परदेश पर्यटन कमी करण्याचं आवाहन देशवासियांना केलंय. कच्चं तेल, सोनं याच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन लागतं आणि ते वाचवण्याची गरज असल्याचंही मोदींनी म्हटलं.