उत्तर प्रदेशातील संभल येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमधील वादाचे रूपांतर हिंसक भांडणात झाले. संतप्त झालेल्या पत्नीने तिच्या पतीच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केला. पतीचा ओरडणे ऐकून कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताळलेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला अलीगढ येथे रेफर करण्यात आले. तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.