Bhadra Tiger Reserve Video
esakal
देश
Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल
Rare Black Panther and Leopard Sighting in Bhadra Tiger Reserve : कर्नाटकच्या भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा दुर्मिळ व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Viral Wildlife Video Captured at Bhadra Backwaters : कर्नाटकातील प्रसिद्ध भद्रा व्याघ्र प्रकल्पात (Bhadra Tiger Reserve) अलीकडेच एक दुर्मिळ आणि मन मोहून टाकणारा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भद्रा बॅकवॉटर्स परिसरात एक ब्लॅक पँथर आणि एक बिबट्या एकाच वेळी शांतपणे पाणी पिताना दिसून आले. हा अनोखा क्षण ९ फेब्रुवारी रोजी टिपला गेला असून सध्या सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
