हिवाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 11 October 2020

देशात कोरोना महामारीमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली- देशात कोरोना महामारीमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात हिवाळ्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होईल का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेक अहवालामध्ये हिवाळ्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होईल, असा दावा करण्यात आलाय. याच मुद्द्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी भाष्य केले आहे. हिवाळ्याच्या काळात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

'योगीराज'मध्ये मागील दोन वर्षांत 20 साधुंची हत्या, काँग्रेसचा दावा

SARS Cov 2 हा संसर्गजन्य आजार आहे. अशा प्रकारचे आजार हिवाळ्याच्या काळात आणखी बळावतात. श्वसनासंबधी विषाणू हिवाळ्यामध्ये आणि कमी आर्द्रतेमध्ये जास्त वाढतात. आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. हिवाळ्याच्या काळात अनेक लोक घराबाहेर जमत असतात. भारतीयांची सवय लक्षात घेता, या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं हर्ष वर्धन म्हणाले आहेत. ते ''संडे संवाद'' या कार्यक्रमात बोलत होते.  

हर्ष वर्धन यांनी यावेळी यूरोपीय देशांची उदाहरणे दिली. यूकेमध्ये हिवाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असं त्यांनी सांगितलं. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. भीती बाळगण्याचे कारण नाही. मास्क घाला आणि शारीरिक अंतराचे पालन करा. आजार होण्यापूर्वीच काळजी घेतलेली बरी, असं हर्ष वर्धन म्हणाले. 

डोनाल्ड ट्रम्प यांची देवासारखी पूजा करणाऱ्या कृष्णाचा हार्ट अटॅकने मृत्यू

यूकेतील एका आरोग्य संस्थेनुसार, हिवाळा खूप आव्हानात्मक असणार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये रुग्ण संख्येचा 'पीक' पाहायला मिळणार आहे. शिवाय हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढेल. The National Centre for Disease Control (NCDC) ने दिल्लीला सतर्क केले आहे. हिवाळ्यात दिल्लीमध्ये दररोज 15 हजार रुग्ण सापडतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

हिवाळा हा श्वसनासंबंधी आजाराच्या वाढीचा काळ असतो. शिवाय याच काळात देशात अनेक उत्सव साजरे केले जातात. अनेक ठिकाणी गर्दी होत असते. त्यामुळे अनेक ठिकाणी अचानक रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारी करण्याची गरज आहे. दिल्लीत बाहेरुन येणाऱ्या लोकांमुळे हा धोका अधिक वाढेल, असं NCDC ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Covid cases increase in India during winter Harsh Vardhan gave answer