

India Russia Friendship Tested After Trump Statement
Esakal
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर शिक्कामोर्तब झालं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी फोनवर चर्चा केल्यानंतर या व्यापार कराराची घोषणा करण्यात आली. भारतावर अमेरिकेकडून लावण्यात येणारं आयात शुल्क ५० टक्क्यांवरून थेट १८ टक्के करण्यात आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की भारत आता रशियन तेल खरेदी करणं बंद करेल आणि यामुळेच हा करार होऊ शकला आहे. दरम्यान, भारताने या दाव्यावर काही प्रतिक्रिया अद्याप दिली नाहीय.