"...तर अशा चुका आम्ही शंभर वेळा करु"; प्रियंका चतुर्वेदींची मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत केलेल्या भाषणावरुन त्यांनी निशाणा साधला आहे.
Priyanka Chaturvedi_PM Modi_LokSabha Speech
Priyanka Chaturvedi_PM Modi_LokSabha Speech
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणामधून (Narendra Modi Lok Sabha speech) कोरोना काळातील स्थितीवरुन काँग्रेससह (Congress) विरोधी पक्षांना टार्गेट केलं होतं. त्यांच्या या भाषणावर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याचबरोबर राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या (ShivSena) खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी देखील मोदींवर निशाणा साधला आहे. (will make such mistakes hundred times Priyanka Chaturvedi criticizes PM Modi)

चतुर्वेदी यांनी एकामागून एक ट्विट करत म्हटलं, "लॉकडाऊन जाहीर होण्याच्या चार तास आधी वाहनं थांबली, आंतरराज्य प्रवास थांबला. यामुळं स्थलांतरित आणि मुख्यत्वे रोजंदारी करणारे मजूर अडकून पडले. अशा वेळी त्यांची काळजी घेणं त्यांना अन्न आणि निवारा उपलब्ध करुन देणं हे जर पंतप्रधानांच्या दृष्टीने चुकीचं होतं तर मानवतेसाठी आम्ही शंभर वेळा ही चूक करु. श्रमिक गाड्या सुरू झाल्या तेव्हा उत्पन्न नसलेल्या या गरीब मजुरांना तिकिटासाठी पैसे आकारले जात होते हे देश विसरू शकणार नाही. पण त्यांचं प्रवास भाडं देण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलली आणि पंतप्रधानांच्या नजरेत ती चूक असेल तर आम्ही शंभर वेळा ही चूक करायला तयार आहोत"

"ज्यावेळी प्रवाशांना जेवण किंवा पाणी उपलब्ध नव्हतं तेव्हा त्यांना दिलासा देण्याची चूक झाली असेल तर अशी चूक आम्ही शंभर वेळा करु. मृत झालेली आई आणि तिच्या दोन लहान मुलांची हतबल अवस्थेतील ती स्थिती कोण विसरेल? राज्यांनी मागणी करुनही त्यांना रेल्वे गाड्या दिल्या नाहीत. तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी त्यावेळी राजकारण केलं. अशा परिस्थितीत देशातील नागरिकांना एकटं सोडायचं होतं का? असा सवाल करत या प्रश्नावर टिप्पणी करण्यापूर्वी थोडी संवेदनशीलता बाळगा" अशा शब्दांत चतुर्वेदी यांनी मोदींवर निशाणा साधला.

उलट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं चुकीच्या पद्धतीनं व्यवस्थापन करण्यात आलं. कारण बेड, ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा वाढवण्याकडे मोदींचं लक्षचं नव्हतं उलट ते निवडणुकीच्या रॅलींमध्ये मतं मिळविण्यात व्यस्त होते. याकाळात लसींचा पुरेसा साठा करण्यातही केंद्र सरकार अयशस्वी ठरलं, त्यामुळं मोदींनी आपल्या भाषणात थोडा तरी प्रामाणिकपणा ठेवावा, असंही प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींच्या भाषणावर टीका करताना म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com