CAB : सुधारित कायद्याची अंमलवजावणी नाही; प. बंगालमध्येही आंदोलनाचा भडका

Will not allow CAB to be implemented in Bengal Says Mamata Banerjee
Will not allow CAB to be implemented in Bengal Says Mamata Banerjee

उलुबेरिया (पश्‍चिम बंगाल) : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAB) आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) निषेधार्थ पश्‍चिम बंगालमधील उलुबेरिया येथे हजारो मुस्लिम नागरिकांनी रस्त्यावर उतरून आज आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमाक सहा रोखून धरला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रध्वज हातात घेतलेल्या हजारो आंदोलकांनी दुपारी अडीचच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमाक सहावर उलुबेरिया येथे रास्ता रोको आंदोलन केले. हा महामार्ग कोलकत्याला देशाच्या इतर भागांशी जोडतो. रास्ता रोको आंदोलनानंतर महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला.

या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मौलाना गुलाम मुस्तफा यांनी सांगितले, की राज्यघटनेचे संरक्षण करत, आम्ही भारताचे विभाजन होऊ देणार नाही. पश्‍चिम बंगाल हे धर्मनिरपेक्ष राज्य असून, आमचा सीएबी आणि एनआरसीला विरोध आहे. सीएबी आणि एनआरसीच्या माध्यमातून धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. मात्र, आम्ही तो हाणून पाडू, असे मुस्तफा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

पुणे : विद्यापीठात तरुणीची छेड काढणारा पोलिसांच्या ताब्यात

कुठल्याही परिस्थितीत पश्‍चिम बंगालमध्ये सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) अंमलबजावणी करणार नाही, अशा शब्दांत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केंद्राला आव्हान दिले. या कायद्याच्या अंमलबजाणीसाठी केंद्र सरकार राज्यांवर दबाव टाकू शकत नाही. सुधारित नागरिकत्व कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. संसदेत बहुमत असले म्हणून तुम्ही तुमची मते आमच्यावर लादू शकत नाहीत. लोकशाहीमध्ये सर्वांना सोबत घेऊन सर्वसहमतीने निर्णय घेणे आवश्‍यक असते, असे सांगत बॅनर्जी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात पश्‍चिम बंगालमध्ये मोठे आंदोलन उभे करण्याची घोषणा केली. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त दिल्लीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या बैठकीला उपस्थित राहणार नसून, दिल्ली दौरा रद्द केल्याची घोषणा बॅनर्जी यांनी केली.

शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस

सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे भारताचे विभाजन होईल. जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत, तोपर्यंत राज्यातील एकाही नागरिकाला देश सोडून जावे लागणार नाही. - ममता बॅनर्जी, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com