

Sugar Price Hike Stock Limit
esakal
Sugar Prices India : सणासुदीच्या काळात साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण होऊन दर वाढू नयेत, यासाठी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांच्या साखर साठवणुकीवर मर्यादा घातली आहे. १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत व्यापाऱ्यांना साखर मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. तसेच, एका व्यापाऱ्याला एकावेळी जास्तीत जास्त एक हजार क्विंटल साखर साठवता येणार आहे.