पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आता तरी ऐकणार का? प्रियांका गांधी यांचा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना सवाल

हाथरस - आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
हाथरस - आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

नवी दिल्ली - संवादातून समस्या सोडविण्यावर भर असल्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणतात, माग आता तरी ते पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेणार का? असा प्रश्न काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज उपस्थित केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्तर प्रदेशातील हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून राज्य सरकारवर चहूबाजूंनी टीका होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारची भूमिका मांडताना संवादातून समस्या सोडवण्यावर जोर दिला. त्याचबरोबर विरोधकांवर गंभीर आरोपही केला होता.

‘संवादातून समस्यांवर उपाय शोधण्याची गोष्ट करणारे मुख्यमंत्री पीडित कुटुंबाचे म्हणणे कधी ऐकून घेणार?, हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांवर कधी कारवाई करणार? न्यायलयीन चौकशीचे आदेश कधी देणार?’ असे प्रश्न प्रियांका गांधी यांनी ट्विटद्वारे विचारले आहेत. 

तसेच पीडितांची व्यथा ऐकून घेणे ही न्यायाची पहिली पायरी आहे. पण सत्ताधारी भाजपच पीडितेविषयी वाईट प्रचार करत आहे, ही वस्तुस्थिती आहे, अशी टीकाही प्रियांका गांधी यांनी केली. 

पोलिसांनी मागितली माफी
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका १९ वर्षीय दलित युवतीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या पीडितेच्या कुटुंबीयांची काँग्रेसचे नेते राहुल गांधी व  प्रियांका गांधी यांनी शनिवारी भेट घेतली. मात्र, या भेटी आधी राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना पोलिसांकडून रोखण्यात आले होते. या वेळी लाठीमार करण्यात आला. यात एका पोलिसाने प्रियांका गांधींशी गैरवर्तन केल्याचे समोर आले. हा फोटो  व्हायरल झाला होता. अखेर या गैरवर्तनाप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधी यांची माफी मागितली आहे.

‘आप’च्या खासदारावर शाईफेक
हाथरस/लखनौ - हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले आम आदमी पक्षाचे खासदार संजयसिंह यांच्यावर सोमवारी शाई फेकण्यात आली. संजयसिंह हे प्रसारमाध्यमांशी बोलण्यापूर्वीच एका व्यक्तीने त्यांच्या कपड्यांवर शाई फेकली ‘पीएफआय दलाल परत जा,’ अशी घोषणाही त्याने दिली. ‘द पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ही इस्लामी दहशतवादी संघटना आहे. या घटनेनंतर संजयसिंह तातडीने निघून गेले. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com