esakal | अभिनंदन, अभिनंदन! पुन्हा झेपावले 'त्या' दिशेने
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनंदन, अभिनंदन! पुन्हा झेपावले 'त्या' दिशेने

विंग कमांडर अभिनंदन यांनी आज सेवेत पुन्हा रुजू झाल्यानंतर पहिल्यांदा मिग-२१ विमानाचे उड्डाण केले. पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावरून विंग कमांडर अभिनंदन यांनी उड्डाण केले. एअर चिफ मार्शल बीएस धनोआ आणि विंग कमांडर अभिनंदन यांनी एकत्रित उड्डाण केल्याची माहिती हवाई दलाकडून देण्यात आली.

अभिनंदन, अभिनंदन! पुन्हा झेपावले 'त्या' दिशेने

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने पाडण्याचा पराक्रम केलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे वायुदलाच्या सेवेत पुन्हा रुजू झाले आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतले होते. पण, जिनेव्हा करारामुळे पाकिस्तानला त्यांची सुटका करावी लागली होती. १ मार्च रोजी वाघा बॉर्डरवरून भारतात परतलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांनी आज सेवेत पुन्हा रुजू झाल्यानंतर पहिल्यांदा मिग-२१ विमानाचे उड्डाण केले. पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावरून विंग कमांडर अभिनंदन यांनी उड्डाण केले. एअर चिफ मार्शल (हवाई दल प्रमुख) बी.एस. धनोआ आणि विंग कमांडर अभिनंदन यांनी एकत्रित उड्डाण केल्याची माहिती हवाई दलाकडून देण्यात आली. अभिनंदन यांनी सहा महिने सहा दिवसानंतर पुन्हा लढाऊ विमानातून आकाशात झेप घेतली आहे.

सत्ता आहे तिकडे जाणे योग्य नाही : उदयनराजे भोसले

वैद्यकीय तपासणीनंतरच उ्डडाणाची परवानगी
पठाणकोट हा भारतीय हवाई दालच्या २६ स्वॉड्रनचा फ्रंट लाईन फायटर बेस आहे. भारतीय हवाई दलाने रशियन बनावटीची दहा मिग-२१ या लढाऊ विमाने यात समाविष्ट केली होती. भारतीय हवाई दल लवकरच मिग-२१चा वापर बंद करणार आहे. या मिग-२१ विमानाच्या साह्याने विंग कमांडर अभिनंदन यांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानची दोन विमाने पाडली होती. १४ फेब्रवारी रोजी काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. त्यात ४० जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. त्यावेळी हवाई दलाने पाक व्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राईक करत दहशतवादी तळ उद्धवस्थ केले होते. १ मार्च रोजी भारतात परतल्यानंतर बंगळूरच्या "इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन'मध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी झाली होती. वैद्यकीय तपासणीनंतरच अभिनंदन यांना पुन्हा हवाई उड्डाण करण्याची परवानी देण्यात आली होती. आज, त्यांनी "मिग-21 बायसन' या लढाऊ विमानातून पुन्हा उड्डाण केले.

अमित शहांची बंद खोलीत तीन तास चर्चा

आबा, काय घाई होती जाण्याची; शरद पवार गहिवरले

मिग-२१ची उल्लेखनीय कामगिरी
कारगील युद्ध प्रामुख्याने काश्मीरमधील डोंगराळ भागात लढले गेले. या युद्धा लष्कराबरोबरच हवाई दलाचेही मोठे योगदान होते. हवाई दल प्रमुख बी.एस. धनोआ हे देखील मिग-२१ हा लढाऊ विमानाचे पायलट होते. त्यांनी कारगील युद्धात मोलाची कामगिरी बजावली होती. कारगीलमधील टेकड्यांवर घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी घुसखोरांची रसद तोडण्याचे काम धनोआ यांनी केले होते.

loading image
go to top