हिटलरही शाकाहारी होता पण बाह्यरुपावरुन...; हायकोर्टाचं निरीक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hitler
हिटलरही शाकाहारी होता पण बाह्यरुपावरुन...; हायकोर्टाचं निरीक्षण

हिटलरही शाकाहारी होता पण बाह्यरुपावरुन...; हायकोर्टाचं निरीक्षण

चेन्नई : एका बलात्कार प्रकरणावर (Rape Case) सुनावणी करताना मद्रास हायकोर्टानं (Madras High Court) जर्मनीचा हुकुमशहा अॅडॉल्फ हिटरल (Adolf Hitler) याचा दाखला दिला आहे. हिटरलच्या बाह्यरुपावर जाता येणार नाही कारण तो शाकाहारी असला तरी ८० लाख लोकांचा प्राण्यांप्रमाणं तिरस्कार करत होता, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. (With outer appearance Hitler was vegetarian but was a cruel Madras High Court)

एका लहान मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा मद्रास हायकोर्टानं कायम ठेवली. या खटल्यावेळी कोर्टानं हिटरलचा दाखला दिला. कोर्टानं म्हटलं की, प्रत्येक माणसाच्या मनात लबाडपणाची, फसवणूकीची आणि पापीपणाची भावना असते. त्याच्या बाह्यरुपावरुन आपण त्याला पारखू शकत नाही. अॅडॉल्फ हिटरलचचं बघा ना, तो शाकाहारी होता पण त्यानं ८० लाख लोकांचा प्राण्यांप्रमाणं द्वेष केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top