
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून दिल्लीत मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त असताना महिला खासदाराची चेन हिसकावून चोरी केल्याची धक्कादायक घटना घडलीय. राजधानी दिल्लीत नेते ज्या भागात राहतायत तिथं सुरक्षेची अशी स्थिती असेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न आता विचारला जात आहे. दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात घडलेल्या या घटने प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. सुधा रामकृष्णन असं महिला खासदाराचं नाव आहे.