भर उन्हात वृद्ध महिलेला 5 किमी नेले खांद्यावर, गृहमंत्र्यांकडून महिला पोलिसचे कौतुक

राज्याच्या गृहमंत्र्यांनी ट्विट करून या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कामाचे कौतुक केले आहे.
viral photo
viral photosakal
Updated on

गुजरातमधील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यातचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. माणूसकीचे दर्शन घडवणारा हा व्हिडीओ आहे. भर उन्हात एका वृद्ध महिलेला खांद्यावर पाच किलोमीटर उचलून घरी नेण्याचे काम एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने केले आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी ट्विट करून या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कामाचे कौतुक केले आहे. (Woman police officers carried old woman on her shoulders for five km photos goes viral)

viral photo
Viral Video: दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी अंगावर फेकतात आगीचे गोळे; 'थूथेधरा'ची अनोखी परंपरा

या व्हिडिओत महिला पोलीस कर्मचाऱ्याने वृद्ध महिलेला कडक उन्हात स्वत: च्या खांद्यावर 5 किलोमीटर उचलून सुखरूप घरी पोहोचवले. ही वृद्ध महिला गुजरातमधील कच्छमधील एका मंदिरात मोरारीबापूंची कथा ऐकण्यासाठी आली होती. यादरम्यान उन्हामुळे ती बेशुद्ध झाली होती. या महिला पोलिसाचे देशभरातून कौतुक केले जात आहे.

viral photo
खाद्यतेल आणखी महाग होणार; इंडोनेशियाचा निर्णय भारतासाठी ठरणार घातक

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी (Harsh Sanghvi) यांनी महिला पोलिसाचे कौतुक करत 'खाकीची मानवता' असे ट्विट केले आहे. वर्षाबेन परमार असे महिला पोलीस अधिकारीचे नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com