अन् तिने स्वतःच्या 6 वर्षांच्या मुलीच्या अंगावरच ओतले पेट्रोल

वृत्तसंस्था
शनिवार, 7 डिसेंबर 2019

या पीडितेला न्याय मिळण्यासाठी सफदरजंग रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या एका महिलेने तिच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर आपल्या सहा वर्षांच्या मुलीवरच पेट्रोल ओतले.

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला पेटविल्यानंतर आज (शनिवार) तिचा मृत्यूशी लढा थांबला. त्यानंतर सफदरजंग रुग्णालयाबाहेर या पीडितेला न्याय मिळण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एका महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलीवरच पेट्रोल ओतल्याची खळबळजनक घटना घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेवर गुरुवारी सकाळी न्यायालयाकडे जात असताना नराधमांनी हल्ला करत तिला पेटवून दिले होते. अखेर आज (शनिवार) सुमारे 40 तासांनी तिच्या किंकाळ्या शांत झाल्या असून, तिचा मृत्यूशी लढा अपयशी ठरला आहे. गुरुवारी तिला पेटवून दिल्यानंतर लखनौहून तिला एअर ऍम्ब्युलन्सने दिल्लीला उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, ती 90 टक्के भाजली असल्याने अखेर तिचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला.

तिच्या किंकाळ्या अखेर थांबल्या; उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू

या पीडितेला न्याय मिळण्यासाठी सफदरजंग रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या एका महिलेने तिच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर आपल्या सहा वर्षांच्या मुलीवरच पेट्रोल ओतले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या महिलेला ताब्यात घेतले. या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बलात्काऱ्यांचा जागेवर ‘फैसला’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman protesting against Unnao rape case threw petrol on her 6 year old daughter