मालक म्हणाला, माझ्या पत्नीसोबत प्रेम कर अन्...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

मालकाने त्याच्याकडे कामाला असलेल्या युवकाला पत्नीसोबत प्रेमसंबंध ठेवायला सांगितले. दोघांमध्ये प्रेमसंबध निर्माण झाल्यानंतर तोडण्यासाठी दबाव आणू दोघाला. पण, पत्नी प्रेमसंबंध तोडू देत नव्हती, या प्रकारामुळे युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.

अहमदाबाद (गुजरात): मालकाने त्याच्याकडे कामाला असलेल्या युवकाला पत्नीसोबत प्रेमसंबंध ठेवायला सांगितले. दोघांमध्ये प्रेमसंबध निर्माण झाल्यानंतर तोडण्यासाठी दबाव आणू दोघाला. पण, पत्नी प्रेमसंबंध तोडू देत नव्हती, या प्रकारामुळे युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.

पोलिसावर जडले मेव्हणीचे प्रेम अऩ्...

मालकाचे वय 45 आणि त्याच्या पत्नीचे वय 25 आणि आत्महत्या केलेल्या युवकाचे वय 19 आहे. अहमदाबादमध्ये पाच महिन्यापूर्वी युवकाने आत्महत्या केली होती. या आत्महत्येचे कारण मोबाईलमुळे उघड झाले असून, या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. वासना पोलिसांनी निखील परमार या युवकाच्या आत्महत्येप्रकरणी मालक व त्याच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Video: बायकोने 'त्या' दिवशी सजवला 'असा' बेड अन्...

पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'निखिल परमार हा लग्नासाठी सजावटीचे साहित्य पुरवणाऱ्या एका कंपनीमध्ये ऑक्टोबर 2018 पासून काम करत होता. दहा महिने काम केल्यानंतर त्याने मालक व त्याची पत्नी छळ करत असल्यामुळे कामाला जाणार नसल्याचे वडिलांना सांगितले. त्यामुळे त्याने नोकरी सोडली होती. निखिलच्या मालकाने त्याला 14 जुलै 2019 रोजी फोन करून पगार घेऊन जाण्यास सांगितले. 15 जुलै रोजी निखिलने वडिलांना मालकासोबत राजस्थानमध्ये एका कामासाठी जात असल्याचे सांगितले. 20 जुलै रोजी निखिलच्या मालकाने त्याच्या वडिलांना फोन केला व तुमच्या मुलाने गोडाऊनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. निखीलचे वडील घटनास्थळी पोहचल्यानंतर मृतदेह ऑफिसमध्ये अढळून आला होता. निखीलच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी त्याचे नातेवाईक संजय आणि निशा फोन तपासला असता धक्कादायक मेसेजेस अढळून आले. निखिलचा मालक आणि त्याच्यादरम्यान झालेल्या संभाषणामध्ये दोघांमध्ये वाद झाल्याचे मेसेजमधून दिसून आले. 'तू माझ्या पत्नीला तुझ्या प्रेमात पाडण्यास भाग पाड असे तुम्ही मला सांगितले. मी तुमच्या सांगण्याप्रमाणे वागलो आणि तुमची पत्नीही माझ्या प्रेमात पडली. तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही काही काळ अनैतिक संबंधामध्ये होतो. मात्र, अचानक तुम्ही आम्हाला हे नातं संपवण्यास सांगितले. असे केले नाही तर तुला पगार देणार नाही, अशी धमकीही तुम्ही मला दिली. कृपया मला एखाद्या गुलामासारखी वागणूक देऊ नका. माझ्यावर दया करा.” असा मेसेज निखिलने मालकाला पाठवला होता.'

नशीब हे बलात्कारासारखे असते, त्याचा आनंद तर घ्या

प्राथमिक तपासामध्ये वासना पोलिसांनी निखिलच्या मालकाने त्याला पत्नीबरोबर प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पडल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर मालकानेच पुन्हा तोडण्यास सांगितले. प्रेमसंबंध तोडत असल्याचे सांगितल्यामुळे मालकाची पत्नी संतापली व तिने निखिलला शिवीगाळ केली. आपले प्रेमसंबंध चालू ठेवू, असे तिचे म्हणणे होते. पण, निखिलच्या मालकाला हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे या दोघांच्या त्रासाला निखिल कंटाळला होता. मानसिक तणावातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले, अशी माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पती म्हणतो, तुला तिसरं मुल झालंच कसं?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ahmedabad teen killed self after boss made him love his wife