World Anaesthesia Day: ॲनेस्थेशियाने बदलली विज्ञानाची दिशा! कसा लागला शोध? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Anaesthesia Day

World Anaesthesia Day: ॲनेस्थेशियाने बदलली विज्ञानाची दिशा! कसा लागला शोध?

Anaesthesia Day: १६ ऑक्टोबर या दिवसाची इतिहासाच्या पानांत एका खास कारणासाठी नोंद केल्या गेली आहे. विलियम थॉमस ग्रीन मॉर्टनने ईथर ॲनेस्थेशियाचा पहिल्यांदा शोध लावला. १८४६ मध्ये त्यांनी मॅसाच्युसेट जनरल हॉस्पिटलमध्ये ईथर ॲनेस्थियाचं यशस्वी प्रदर्शन केलं. अनेकांना माहितीच असेल कोणतीही सर्जरी करताना रूग्णाला त्रास होऊ नये म्हणून त्याला ॲनेस्थेशिया देऊन सर्जरी होत असलेल्या शरीराचा भाग बधिर केला जातो. मात्र सर्जरीमध्ये सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या ॲनेस्थेशियाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे काय?

अॅनेस्थेशिया शरीरात कसं काम करतं ?

अॅनेस्थेशिया रूग्णाच्या शरीरात टोचल्यानंतर त्यांच्या ब्रेनपर्यंत पोहोचणाऱ्या व्हेसल्स बधिर पडतात. मनुष्य शुद्धीत नसतो. त्यामुळे कुठलीही सर्जरी करताना रूग्णाला त्यांच्या वेदना जाणवत नाही. मात्र याचा प्रभाव संपताच मानवी संवेदना परत येतात. अॅनेस्थेशिया श्वसन मास्क किंवा ट्यूबच्या माध्यमातून विंडपाइपमध्ये सोडल्या जातो.

हेही वाचा: Vaginal health : योनीमार्गाचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी हे पदार्थ खा

सर्जरी पूर्ण झाल्यानंतर अॅनेस्थेशिया देणं डॉक्टर बंद करतात. यानंतर काही वेळ रूग्णांमध्ये सुस्ती, गळ्यात खरखर किवा अर्धवट झोप आणि व्हेसल्समध्ये दुखणं जाणवू शकते. मात्र सर्जरीच्या त्रासापासून वाचण्यास अॅनेस्थेशिया महत्वाची कामगिरी पार पाडते.

टॅग्स :HospitalWorldsurgery