Top Mosques of India: भारतातील ह्या मशिदी आहेत जगभरात प्रसिद्ध; एकदा तरी भेट द्याच

तुम्हाला रमजान महिन्यात एखाद्या मशिदीला भेट द्यायची असेल तर आम्ही तुम्हाला भारतातील काही खास मशिदींमबद्दल सांगणार आहोत. भारतातील विविध भागात असलेल्या या मशिदी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत
Top Mosques of India
Top Mosques of IndiaEskal

Top Mosques of India: जगभरातील मुस्लीम बांधवांसाठी रमजानचा पवित्र महिना खुपच खास असतो. इस्लाम धर्मातील कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज या चार स्तंभांपैकी रोजा एक आहे.

रमजान महिन्यात  मुस्लीम बांधवांकडून विविध प्रकारची इबादत केली जाते. यात नमाज पठण, रोजा, कुराण पठण आणि तरावीहची विशेष नमाजाचे पठण अशा विविध प्रकारे इबादत केली जाते. World Famous Masjids Located in India Ramadan Special

रमजानच्या Ramadan या पवित्र महिन्यात मशिदींनादेखील  रंगरंगोटी केली जाते. रमजान पर्वात तराविहची विशेष नमाज पठण केले जाते. प्रत्येकी दोन रकात अशी २० रकात नमाज मशिदीमध्ये केली जाते.

या महिन्याच देवपुजेचं म्हणजेच अल्लाहची Allah उपासना करण्याला खास महत्व आहे. जर तुम्हालाही या महिन्यात एखाद्या मशिदीला भेट द्यायची असेल तर आम्ही तुम्हाला भारतातील काही खास मशिदींमबद्दल सांगणार आहोत. भारतातील विविध भागात असलेल्या या मशिदी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत.

दिल्लीतील जामा मस्जिद:

दिल्लीतील जामा मस्जिद जगभरात प्रसिद्ध आहे. या मशिदीचं खरं नाव ए जहान नुमा असं आहे. मुघल बादशहाने १६५०-५६ या काळात या मशिदीची उभारणी केली होती. त्याकाळी या मशिदीच्या निर्मितीसाठी १० लाख रुपये खर्च करण्यात आले होते.

हे मस्जिद लाल दगज आणि मांढख्या मार्बलपासून तयार करण्यात आलंय. रमजानच्या महिन्यात या मशिदीत हजारोंहून अधिक मुसलमान बांधव नमाज पठण करण्यासाठी येत असतात. या मशिदीत एकावेळी २५ हजार लोक नमाज पठण करू शकतील एवढी क्षमता आहे.

हैदराबादमधील मक्का मस्जिद:

देशातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी हैदराबादमधील मक्का मस्जिद एक आहे. सुलतान महम्मद कुली कुतुब शाहने हे मस्जिद तयार करवून घेतली होती. या मशिदीत एकावेळी २० हजार लोक नमाज पठण करू शकतात. या मस्जिदमधील मुख्य दालन असलेल्या हॉलची उंची ७५ फूट एवढी आहे.

हे देखिल वाचा-

Top Mosques of India
Ramadan 2023 Fasting Tips: रमजान महिन्यात रोजे ठेवताना अशी घ्या आरोग्याची काळजी

भोपाळमधील ताज-उल-मस्जिद:

देशातील सर्वात मोठी मस्जिद ही भोपाळमध्ये आहे.  एशियातील सर्वात मोठ्या मशिदींमध्ये भोपाळमधील ताज-उल मशिदीची गणना केली जाते. मुगल बादशाह बहादूर शाह जफर यांच्या कार्यकाळात नवाब असेलल्या सैयद सिद्दीकी हसन खान यांच्या पत्नी शाह जहां बेगम यांनी ही मस्जिद बनवण्यास सुरुवात केली होती.

त्यांच्यानंतर त्यांची मुलगी सुल्तान जहान बेगम हिनं या मस्जिदला पूर्ण केलं. या मशिदीच्या निर्मितीसाठी जवळपास १४१ वर्ष लागली. या मशिदीमधील भव्य अष्टकोनी मिनार, कमानदार दरवाजे, नऊ घुमट असलेली प्रवेशद्वार, फ्रेस्को पेंटिग हे लक्षवेधी आहे.

आग्र्यातील जामा मस्जिद:

मुगल बादशहा शाहजंहाने देशभरात अनेक कलाकृतींची निर्मिती केली. याचपैकी एक म्हणजे आग्रास्थित असलेली जामा मस्जिद. शाहजहांने त्यांची मुलगी जहां आरा हिच्या आठवणीत या जामा मस्जिदची उभारणी केली होती. या मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीच्या कमीनी अतिशय सुंदर आहेत.

अजमेर स्थित अढाई दिन का झोपडा:

अजमेर शरीफच्या दर्गाबद्दल तर अनेकांनी ऐकलं असेलच इथं देशभरातून लाखो लोक दर्शनासाठी  तसंच नवस बोलण्यासाठी येत असतात. ही मस्जिद अत्यंत जुनी असली तरी ती अत्यंत आकर्षक आणि अनोखी आहे.

एका संस्कृत महाविद्यालयाचं कालांतराने या मशिदीत रुपांतर करण्यात आलं.  सध्या या मशिदीचे काही भाग भग्नावस्थेत आहेत.

श्रीनगरमधील जामिया मस्जिद

भारतातील सर्वात पवित्र अशा मशिंदीपैकी एक म्हणजे श्रीनगरमधील जामिया मशिद. या मशिदीत ३३ हजार लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे.

हे देखिल वाचा-

Top Mosques of India
Ramzan Ramadan 2023 : इफ्तारीला बनवा शाही तुकडा, जाणून घ्या शाही रेसिपी

लखनऊमधील बडा-इमामबाडा

लखनऊ हे अत्यंत सुंदर शहर असून इथे अनेक सुंदर महाल आहेत. तसंच इथे भारतातील काही मोठ्या मशिदींपैकी एक बडा- इमामबाडा ही मस्जिद आहे. १७८४ साला इथल्या नवाबाने या मशिदीची उभारणी केली होती. या मशिदचं छत बांधताना कोणत्याही बीमचा म्हणजेच सळईचा किंवा गर्डरचाही वापर करण्यात आलेला नाही.

असं म्हणतात या मशिदीच्या बांधकामासाठी कोणताही धातू किंवा लाकूड वापरण्यात आलेले नाही. लखनवी विटा वापरून बांधकाम करण्यात आलंय. तर प्लास्टरसाठी चुन्याचा वापर करण्यात आलाय.

अहमदाबादमधील जामा मस्जिद -

अहमदाबादमध्ये असलेली जामा मस्जिद ही भारतातील सर्वात  मोठ्या मशिदींपैकी एक आहे. सुलतान अहमद शाहने १४२४ साली ही मशीद उभारली.

या मशिदीत सुलतानच्या राण्या, त्याचा मुलगा आणि त्याची कबर देखील आहे. या मशिदीचं इंडो- इस्लामिक बांधकाम आकर्षक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com