
आजही रेडिओ संपूर्ण भारताच्या हृदयात आहे. गाडी चालवणाऱ्यांपासून ते शेतात नांगरणाऱ्यांपर्यंत सगळ्यांचा सोबती रेडिओ आहे.
आज जागतिक रेडिओ दिवस. या निमित्ताने रेडिओबद्दल (Radio) काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात. एकेकाळी, लोकांकडे टीव्ही, मोबाईल फोन नव्हते, तेव्हा फक्त आवाज होता आणि लोक त्या आवाजावर लगेच विश्वास ठेवायचे. बातम्या, संगीत आणि क्रिकेट Commentaryपासून ते देशाची सत्ता चालवणाऱ्यांपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक या गोष्टी ऐकण्यात आल्या. आजही रेडिओ संपूर्ण भारताच्या हृदयात आहे. गाडी चालवणाऱ्यांपासून ते शेतात नांगरणाऱ्यांपर्यंत सगळ्यांचा सोबती रेडिओ आहे.
भारतात रेडिओची सुरुवात 1923 मध्ये झाली. तेव्हापासून देशाच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या क्षणांचा रेडिओ साक्षीदार बनला आहे. 11 मे 1947 रोजी महात्मा गांधींचे भाषण देशातील जनतेने रेडिओच्या माध्यमातून ऐकले, 1947 मध्ये देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याची माहितीही रेडिओवरून ऐकण्यात आली, देशवासीयांनी सर्व मोठ्या नेत्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. पण बदलत्या काळानुसार रेडिओ हळूहळू लोकांपासून दूर गेला. पण 3 ऑक्टोबर 2014 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा रेडिओला जनतेशी जोडून सुपरहिट केले. मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी देशातील करोडो लोकांना रेडिओशी जोडले.
आज, जागतिक रेडिओ दिनानिमित्त, भारतातील रेडिओच्या प्रवासाशी संबंधित एक मनोरंजक किस्सा पाहूयात. ही कथा रेडिओच्या ट्यूनशी संबंधित आहे, ज्याने भारतातील आकाशवाणीला एक नवीन ओळख दिली. तुम्ही नुकतीच ऐकलेली धून ऑल इंडिया रेडिओची सिग्नेचर ट्यून असायची. या धूनने रेडिओवर कार्यक्रम सुरू व्हायचे. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु हा सूर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचा मोठा हात आहे.
1933 मध्ये जर्मनीतील ज्यूंवर हिटलरच्या अत्याचारामुळे वॉल्टर कॉफमन नावाचे संगीतकार भारतात आले. मुंबईत ऑल इंडिया रेडिओवर संगीतकार म्हणून काम करताना त्यांनी ही ऐतिहासिक धून तयार केली. या सुरात भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यांचा अनोखा मेळ आहे. हिटलरच्या अत्याचाराला कंटाळून वॉल्टर कॉफमन भारतात आला नसता तर भारतात रेडिओची दुसरी धून वाजली असती.
वॉल्टरच्या प्रतिभेचा अंदाज तुम्ही यावरूनही लावू शकता की 1938 मध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी त्यांना एक महान संगीतकार म्हणून वर्णन करणारे पत्र लिहिले होते. एका महान शास्त्रज्ञाची संगीतकाराबद्दलची ही भावना आजही स्मरणात आहे. भारतात रेडिओचा स्वतःचा गौरवशाली इतिहास आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.