
देशातील सर्वच महत्त्वाच्या उद्योगांमध्ये पाय रोवणारा रिलायन्स इंडस्ट्रीज हा उद्योग समूह आता गुजरातमध्ये जगातील सर्वांत मोठे प्राणी संग्रहालय उभारणार आहे. गुजरात हे रिलायन्स उद्योगसमूहाचे होम ग्राउंड म्हणून ओळखले जाते. जामनगर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प साकार होणार आहे.
अहमदाबाद - देशातील सर्वच महत्त्वाच्या उद्योगांमध्ये पाय रोवणारा रिलायन्स इंडस्ट्रीज हा उद्योग समूह आता गुजरातमध्ये जगातील सर्वांत मोठे प्राणी संग्रहालय उभारणार आहे. गुजरात हे रिलायन्स उद्योगसमूहाचे होम ग्राउंड म्हणून ओळखले जाते. जामनगर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प साकार होणार आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या प्राणीसंग्रहालयामध्ये जगभरातील प्राणी, पक्षी आणि सरीसृप प्राण्यांच्या शंभरपेक्षाही अधिक प्रजाती पाहायला मिळतील. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे कनिष्ठ चिरंजीव अनंत अंबानी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे समजते. जामनगरजवळील मोती खावडी येथे कंपनीचा सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प असून त्याच्याजवळच हे प्राणी संग्रहालय उभारण्यात येईल. तब्बल २८० एकरवर हा प्रकल्प उभारण्यात येईल. येथे स्थानिक प्रशासनाच्या मदतीसाठी एक रेस्क्यू सेंटर देखील उभारण्यात येणार असून २०२३ मध्ये ते सुरू होणार असल्याचे रिलायन्सचे कॉर्पोरेट व्यवहार विभागाचे संचालक परिमल नाथवानी यांनी सांगितले.
अनेक उपविभाग
या प्राणीसंग्रहालयाचे नाव ‘ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन किंगडम’ असे असेल अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्राणीसंग्रहालयामध्ये वेगवेगळे विभाग केले जाणार असून त्यामध्ये ड्रॅगन्स लँड, ॲन इन्सेक्टरियम, लँड ऑफ रोडंट, ॲक्वेटिक किंगडम, फॉरेस्ट ऑफ इंडिया असे काही उपविभाग करण्यात आले आहेत.
लाल किल्ला हिंसाचार : दिल्ली पोलिसांनी जारी केले 20 जणांचे फोटो
दुर्मिळ प्राण्यांचा समावेश
या प्राणी संग्रहालयामध्ये आफ्रिकी सिंह, चित्ता, भारतीय लांडगा, आशियायी सिंह, पिग्मी पाणघोडा, ओरांगउटान, लेमूर, शिकार करणारी मांजर, बंगाली वाघ आदी वन्य प्राणी पाहायला मिळतील. कोमोडो ड्रॅगनसारखा दुर्मिळ प्राणी या प्राणी संग्रहालयामध्ये पाहायला मिळणार आहे.
Edited By - Prashant Patil