Wrestlers Protest: "...तर मेडल्स परत करु"; आंदोलक खेळाडूंचा सरकारला थेट इशारा

दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर ऑलिम्पिक विजेते कुस्तीपटू आंदोलनाला बसले आहेत.
Wrestler Protest
Wrestler Protest

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडू दिल्लीत आंदोलनाला बसल्या आहेत. काल रात्री पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये दोन जण जखमी झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर आता या खेळाडूंनी आम्ही आमची खेळातील मेडल्स आणि सरकारनं दिलेला पद्मश्री पुरस्कार परत करु असा थेट इशारा दिला आहे. (Wrestlers Protesters warning govt to return Olympic medals)

कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, "जर आमच्या मेडल्सचा हाच सन्मान आहे तर या मेडलचं आम्ही काय करु. त्यापेक्षा आम्ही सामान्य जीवन जगू. हा सन्मान आम्ही भारत सरकारला परत करु, हे मेडल्स आम्ही भारत सरकारला परत करु. पोलीस धक्काबुक्की करतात शिवीगाळ करतात तेव्हा त्यांना कळतं नाही की, हे पद्मश्री आहेत पण आहेत. केवळ मीच नाही साक्षी पण आहे. पोलिसांनीच या पुरस्काराची लाज ठेवली नाही. त्यांनी दारु पिऊन गैरवर्तन केलं, त्यांना आपण कसं हाताळणार आहात"

Wrestler Protest
Jayant Patil: सरोज पाटलांच्या इच्छेवर जयंत पाटलांचं भाष्य; म्हणाले, अध्यक्षपदासाठी माझं नाव...

देशाची स्थिती आज अशी आहे की, देशाची मुलगी रस्त्यावर बसून दयेची भीक मागत आहे. कोणाला अजून हे देखील वाटत नाही की यांना न्याय द्यावा. आम्हाला अजूनही कोणाला फोन आलेला नाही. जर आपण राजकारणातून बाहेर येत या महिलांना न्याय देऊ शकाल तर संपूर्ण देश आपला आभारी राहिल, असंही पुनिया यानं म्हटलं आहे.

Wrestler Protest
Sharad Pawar: राष्ट्रवादीतील अनेक नेते कुंपणावर! शरद पवारांनी दूर केलं मळभ; ठाकरे गटानं मांडली भूमिका

इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी टी उषा या देखील काल आम्हाला भेटायला आल्या होत्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की, आम्ही तुमचं भलं इच्छितो, तुम्ही प्रॅक्टिस सुरु करा" पण आम्ही त्यांना सांगितलं की, तुम्ही स्वतः खासदार आहात तर आपण संसदेत आवाज उठवू शकतात. आपल्याला देवानं इतकी मोठी शक्ती दिली आहे की तुम्ही भारताचं खेळाचं क्षेत्रातील वातावरण स्वच्छ करु शकतो. यावेळी पंतप्रधानांशी आमची चर्चा करुन द्या, गृहमंत्र्यांशी सांगा आम्हाला बोलवा. आमचं करिअर, जीवन आम्ही पणाला लावलंय, अशा शब्दांत विनेश फोगाट यांनी पत्रकारांशी बोलाताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com