esakal | Pegasus: "मोबाईल हॅक होऊ शकतो तर मग EVM का नाही?"
sakal

बोलून बातमी शोधा

yashwant sinha

Pegasus: "मोबाईल हॅक होऊ शकतो तर मग EVM का नाही?"

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे (जेपीसी) चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून सुरू झाली आहे. काँग्रेसने तशी जाहीर मागणी केली, तर शिवसेनेने लोकसभाध्यक्षांना निवेदन दिले. दरम्यान, या प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेसने पेगॅसस प्रकरणात सरकारला घेरण्यासाठी आक्रमक राहण्याची रणनीती आखली आहे. जर स्मार्टफोन्स पेगॅसिसद्वारे मॅनिप्यूलेट केले जाऊ शकतात, तर मग EVM का नाही? त्यामुळे तातडीने EVM सोडून बॅलेट पेपरचा अवलंब करुयात. असं मत माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी मांडलंय. (Yashwant Sinha If smart phones can be manipulated by Pegasus so can EVM)

हेही वाचा: 67 टक्के भारतीयांमध्ये अँटीबॉडीज; 40 कोटी लोकांना अजूनही धोका

हेही वाचा: कसा अडकला राज कुंद्रा? पॉर्न प्रसारणासाठी नेमकं कोणतं बनवलं होतं ॲप?

संसदेत विरोधक आक्रमक

आज काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. संसदेचे कामकाज सुरू होण्याआधी राज्यसभेतील रणनितीबाबत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, द्रमुकचे तिरुची सिवा, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, शिवसेनेचे संजय राऊत, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आदींची बैठक झाली. दुसरीकडे लोकसभेतील व्यूहरचनेसाठी काँग्रेस नेत्यांचीही बैठक झाली.

दरम्यान, दोन्ही सभागृहांत काँग्रेस खासदारांनी स्थगन प्रस्ताव देऊन या मुद्द्यावर चर्चेची तातडीने मागणी केली होती. राज्यसभेत के. सी. वेणुगोपाल, शक्तीसिंह गोहिल, तर लोकसभेत माणिकम टागोर, गौरव गोगोई यांनी हा प्रस्ताव दिला.

लोकसभेत सकाळी अकराला सभागृह सुरू होताच लोकसभाध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र काँग्रेस खासदारांनी पेगॅसस प्रकरणावरून घोषणाबाजी सुरू केल्यानंतर अवघ्या सहा मिनिटांत कामकाज दुपारी दोनपर्यंत स्थगित करण्यात आले. दुपारनंतरही लोकसभेत कामकाज होऊ शकले नाही. राज्यसभेमध्येही गोंधळामुळे पीठासीन अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले.

दरम्यान, शिवसेनेतर्फे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत, गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, सदाशिव लोखंडे, कृपाल तुमाने, धैर्यशील माने यांनी लोकसभाध्यक्षांना दिले. काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर शिवसेना खासदारांसोबत हजर होते.

loading image