
Jyoti Malhotra Youtuber: पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात युट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या हरियाना पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलिस आणि इतर सुरक्षा एजन्सी ज्योती मल्होत्राची सतत चौकशी करत आहेत. दरम्यान, ज्योती मल्होत्राच्या कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे, हरियाणातील आणखी एका युट्यूबरचा नवांकुरचा चौधरीचा ज्योती मल्होत्रासोबतचा फोटो व्हायरल होत आहे. नवांकुर युट्यूबवर 'यात्री डॉक्टर' नावाचा एक ट्रॅव्हल व्लॉगिंग चॅनेल चालवतो. हरियाना पोलिस आता नवांकुरचीही चौकशी करणार आहेत.