Breaking : येस बॅंकेचा शेअर तेजीत; शेअरधारकांना दिलासा!

वृत्तसंस्था
Tuesday, 17 March 2020

स्टेट बॅंक पुढील तीन वर्षात येस बॅंकेचा एकही शेअर विकणार नसल्याचे स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले आहे.

मुंबई : येस बॅंकेच्या पुनरुज्जीवनाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर ठेवीदारांबरोबर शेअरधारकांना देखील दिलासा मिळाला आहे. सलग सात सत्रात येस बॅंकेच्या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रिझर्व्ह बॅंकेने 5 मार्चला येस बॅंकेवर निर्बंध आणले होते. ठेवीदारांवर खात्यातून कमाल 50 हजार रुपये काढण्याची मर्यादा घालण्यात आली होती. त्यानंतर 6 मार्च रोजी शेअरने 5.50 रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. मात्र रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या उपाययोजनांमुळे शेअरमध्ये पुन्हा तेजी आली.

- Corona Effect : रेल्वेने घेतली कोरोनाची धास्ती; 'या' 23 रेल्वेगाड्या रद्द!

आता या बॅंकेच्या कारभारावरील निर्बंधही येत्या बुधवारपासून (18 मार्च) उठविण्यात येणार आहे. बॅंकेवरील निर्बंध हे बॅंक पुनर्बाधणी योजनेअंतर्गत 18 मार्चपासून सायंकाळी 6 वाजल्यापासून संपुष्टात येणार आहे. तसेच येस बॅंकेच्या एटीएममध्ये देखील पैसे उपलब्ध होतील. तसेच 'लिक्विडिटी'ची समस्या देखील उपस्थित होणार नाही, असे पुनर्रचित येस बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांनी स्पष्ट केले. 

- Corona Virus : पुण्यात आणखी एक रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या पोहचली...

स्टेट बॅंक पुढील तीन वर्षात येस बॅंकेचा एकही शेअर विकणार नसल्याचे स्टेट बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले आहे. केंद्राकडून मंजूर येस बॅंकेच्या पुनर्रचना आराखडयानुसार, बॅंकेत 49 टक्के भागभांडवली मालकी मिळविणाऱ्या स्टेट बॅंकेला पुढील तीन वर्षांत हिस्सेदारी 26 टक्‍क्‍यांखाली आणता येणार नाही.

- ‘या’ जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दराेड्याचा प्रयत्न

तसेच अन्य गुंतवणूकदार तसेच विद्यमान भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीचा 75 टक्के पुढील तीन वर्षे कालावधीसाठी राखून (लॉक-इन) ठेवावी लागणार आहे. मात्र, येस बॅंकेच्या 100 पेक्षा कमी समभाग असणाऱ्या लहान शेअर धारकांना तीन वर्षांचा लॉक-इन कालावधीची अट लागू नसेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yes Bank shares jump nearly 100 percent in 3 days