Ayodhya Verdict : हिंदूंनी मशीद बांधण्यासाठी निधी द्यावा : रामदेव बाबा

वृत्तसंस्था
Saturday, 9 November 2019

या निकालामुळे हिंदू-मुस्लीम या दोन्ही समाजातील लोकांना दिलासा मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण सुरू होते. ते आज निकाली निघाले आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. या निकालाचे देशभरातील सर्व हिंदू धर्मगुरुंनी स्वागत केले आणि लवकरात लवकर राम मंदिर उभारण्याची इच्छाही व्यक्त केली. त्यानंतर योग गुरु रामदेव बाबा यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आपले मत व्यक्त केले.

रामदेव बाबा म्हणाले, ''सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करतो. लवकरच अयोध्येत राम मंदिर उभारले जाईल. तसेच मशीद उभारण्यासाठीही हिंदूंनी मदत करावी, असे मला वाटते.''  

- Ayodhya Verdict : अयोध्या निकालाबाबत राहुल गांधी म्हणाले...

या निकालावर रामदेव बाबा यांनी आपलं मत व्यक्त केले. ते म्हणाले, निकालाचं स्वागत करताना समाजात भीती निर्माण होऊन शांतता भंग पावेल, अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करू नये. सर्वांनी कायदा-सुव्यवस्था जपण्यासाठी नियमांचे पालन करावे. 

रामदेव बाबा पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांना 5 एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला, त्याचे मी स्वागत करतो. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनीही या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले. "या निकालामुळे हिंदू-मुस्लीम या दोन्ही समाजातील लोकांना दिलासा मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण सुरू होते. ते आज निकाली निघाले आहे.''

- Ayodhya Verdict : 'हे' आहेत अयोध्येचा ऐतिहासिक निकाल देणारे 5 न्यायाधीश!

सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर देशभरात शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन सर्व स्तरातून केले जात आहे.

तत्पूर्वी, या निकालाचे न्यायदान करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. शरद बोबडे, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांवर होती.

- भाजप-शिवसेनेला वडिलधारी म्हणून माझा 'हा' सल्ला : शरद पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yoga Guru Ramdev Baba said that Hindus should give funds to build mosque