योगींच्या शपथविधीला 'द काश्मीर फाइल्स' ची टीमही राहणार उपस्थित

दुपारी 4 वाजता भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर शपथविधी सोहळा होणार आहे.
yogi adityanath
yogi adityanathSakal

लखनऊ : नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत (UP Assembly Election) भाजपला मोठे यश मिळाले असून, आज संध्याकाळी राजधानी लखनऊमध्ये योगी आदित्यानाथ (Yogi Adityanath) यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्याला भव्य स्वरूप देण्यासाठी भाजपकडून (BJP) सर्व तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर नुकताच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाच्या टीमलाही आमंत्रित करण्यात आले असून, कार्यक्रमाला अभिनेता अनुपम खेर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप प्रमुख जेपी नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेते, उद्योगपतींसह हजारो पाहुणे उपस्थित राहणार आहेत. (Yogi Adityanath Oath Ceremony )

yogi adityanath
मध्यमवर्गाचा हवाई प्रवासाकडे कल वाढणार; Airbus ने वर्तवला अंदाज

शुक्रवारी (दि.25) दुपारी 4 वाजता भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर शपथविधी सोहळा होणार असून, इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) सामनेही याच स्टेडियममध्ये आयोजित केले जाणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी मैदानावर 20 हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत.

यूपीमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेत आले आहे. योगी हे 37 वर्षातील पहिले मुख्यमंत्री आहेत, जे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक टर्म पूर्ण करून पुन्हा सत्तेवर विराजमान होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com