जेंव्हा योगी आणि अखिलेश यादव एकमेकांना मनस्वी भेटतात... पाहा व्हिडीओ

CM Yogi Meets Akhilesh Yadav
CM Yogi Meets Akhilesh Yadav

लखनौ: एरव्ही एकमेकांवर कोरडे ओसूड ओढणारे एकमेकांचे राजकीय विरोधक प्रत्यक्षात भेटीवेळी मात्र छानपैकी वावरतात. त्यांचं हे वागणं पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटतं. मात्र, राजकीय वैर एकीकडे आणि वैयक्तित नातेसंबंध जपताना दाखवलेली वागणुक एकीकडे, हेच खरं! असंच एक सुखद चित्र आता यूपीच्या विधानसभेमध्ये दिसून आलंय. निवडणुकीमध्ये एकमेकांवर कोरडे आसूड ओढणारे समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेले योगी आदित्यनाथ समोरासमोर आलेले दिसून आलं. ते समोर आल्यावर नेमकं काय झालं, याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. (Yogi Adityanath And Akhilesh Yadav)

CM Yogi Meets Akhilesh Yadav
'तिजोरीच्या चाव्या NCPकडे, सेना-काँग्रेस मंत्र्यांनी फक्त गाड्या फिरवायच्या'

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी कार्यक्रम सध्या सुरु आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह सर्व वरिष्ठ आमदारांना सभापती रमापती शास्त्री शपथ देऊ करत आहेत. सर्वांत आधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेमध्ये सभागृह नेते म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी दरम्यान सभागृहामध्ये जय श्री रामाच्या घोषणा करण्यात आल्या. आमदार आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. (Yogi Adityanath)

CM Yogi Meets Akhilesh Yadav
'मला लेखी धमक्या, सरकार पाडण्यामागे...', पाक PM इम्रान खान यांचा दावा

विरोधी पक्ष नेते अखिलेश यादव यांनी देखील विधानसभेमध्ये सदस्यत्वाची शपथ घेतली. अखिलेश यादव यांनी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांना अभिवादन करत शपथ घेण्यासाठी पोहोचले. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी दरम्यान विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते अखिलेश यादव यांचीही भेट घेतली. ते दोघेही एकमेकांच्या समोर हसत हसत आले. त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अखिलेश यादव यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचंही दिसून आलं. (Yogi Adityanath)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com