...अन्यथा एअर स्ट्राईकसाठी तयार रहावं; योगींनी तालिबानला दिला दम

...अन्यथा एअर स्ट्राईकसाठी तयार रहावं; योगींनी तालिबानला दिला दम

लखनऊ: अफगाणिस्तानात सध्या तालिबानचं राज्य आहे. तालिबानी सत्ताकाळ किती अमानुष असतो, याची प्रचिती फक्त अफगाणी जनतेला नाही तर संपूर्ण जगाला आहे. यादरम्यानच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की, जर तालिबानने भारताकडे वाकडी नजर जरी करण्याची हिंमत केली तर अफगाणिस्तानला एअर स्ट्राईकचा सामना करावा लागेल. लखनऊमध्ये सामाजिक प्रतिनिधी संमेलनात संबोधित करताना त्यांनी ही विधाने केली आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तालिबानच्या सत्तेमुळे त्रासलेले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये कोणताच देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करु शकत नाही.

...अन्यथा एअर स्ट्राईकसाठी तयार रहावं; योगींनी तालिबानला दिला दम
कोण होते डॉ. नरेंद्र दाभोलकर? त्यांना 'पृथ्वीमोलाचा माणूस' असं का म्हटलं गेलं?

मोदींच्या नेतृत्वातील भारत शक्तिशाली

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली आहे. तसेच कुठलाही देश भारताकडे वाकड्या नजरेने देखील पाहण्याची हिंमत करु शकत नाही. आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तालिबानमुळे त्रासलेले आहेत. मात्र, तालिबानला ठाऊक आहे की, जर त्याने भारताकडे कूच करण्याचा जराही विचार केला तरी भारत त्यांच्यावर एअर स्ट्राईक करण्यासाठी तयार आहे.

अफगाणिस्तानवर तालिबानी ताबा

तालिबानने यावर्षीच्या ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. त्याआधी दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेने दोन दशकांपासून अफगाणिस्तानात असणारे आपले सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली होती. गेल्या महिन्यांतच योगी आदित्यनाथांनी अफगाणिस्तान संदर्भात बोलताना म्हटलं होतं की, तालिबानचं समर्थन करणं म्हणजे भारतविरोधी, मानवता विरोधी आणि महिला-बालविरोधी कृत्यांचं समर्थन करणं आहे.

...अन्यथा एअर स्ट्राईकसाठी तयार रहावं; योगींनी तालिबानला दिला दम
''देवेंद्र फडणवीसांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध'', मलिकांचा खळबळजनक दावा

अतिरेकी गटांप्रती सहानुभूती ठेवणाऱ्या लोकांवर टीका करताना आदित्यनाथ यांनी म्हटलंय की, काही असे घटक आहेत जे भारताच्या विकासावर नाक मुरडतात. तालिबानचे समर्थन करणे म्हणजे भारत विरोधी, मानवता विरोधी आणि महिलाविरोधी कृ्त्यांचं समर्थन करण्यासारखं आहे. तुम्ही जाणून असाल की तिथे कशापद्धतीने अत्याचार केला जातो. आणि काही नालायक लोक त्या कृत्याचं समर्थन करत असतात. अशा प्रकारचं समर्थन स्विकारलं जाणार नाही. आपल्याला अशा घटकांपासून सावधान राहिलं पाहिजे, जे तालिबानी कृत्याचं समर्थन करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com