
अंबानी-अडाणींसह दिग्गजांच्या उपस्थितीत योगी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील शपथविधी समारंभ भव्य व अविस्मरणीय होण्यासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, भाजपसाशित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, उद्योजक, साधू-महंतांना निमंत्रण दिलेच आहे. शिवाय बॉलिवूडमधील अभिनेते-अभिनेत्रींच्या उपस्थितीने या समारंभाला ‘चारचाँद’ लागणार आहेत. (Yogi Adityanath swearing-in)
हेही वाचा: मविआ म्हणजे खाऊंगा भी और खानेवालो की रक्षा भी करुंगा; अमृता फडणवीसांची टीका
या शपथविधीला रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि इतर 60 उद्योगपतींनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर नुकताच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाच्या टीमलाही आमंत्रित करण्यात आले असून, कार्यक्रमाला अभिनेता अनुपम खेर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यांच्यासोबतच भाजपला नेहमी पाठिंबा देणारे अक्षय कुमार आणि कंगना रणौत यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. (Yogi Adityanath)
शपथविधीचे आयोजन उद्या शुक्रवारी सायंकाळी चार वाजता येथील अटलबिहारी वाजपेयी स्टेडिअमवर केले असून सुमारे ७० हजार लोक त्यात सहभाही होणार आहेत. बॉलिवूडमधील अक्षय कुमार, कंगना राणावत, अजय देवगण, बोनी कपूर, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री यांच्यासह अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांना निमंत्रण दिलेले आहे. २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून योगी यांच्या शपथविधीला देशभरातील दिग्गज, प्रसिद्ध व्यक्तींना निमंत्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत.
हेही वाचा: 'आम्ही इतिहासाला तोडून - मोडून दाखवतो, का म्हणतोय अनुराग कश्यप असं?
शपथविधीत यांना निमंत्रण
प्रयागराजमधील सुमारे ५०० खास पाहुणे
अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांसह भाजपचे ४०० पदाधिकारी
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरी गिरी महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे सचिव यमुना पुरी महाराज, श्री मठ बाघम्बरी गादी आणि बड़े हनुमान मंदिराचे महंत बलवीर गिरी व सर्व १३ आखाड्यांचे प्रतिनिधी
बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू न्या. गिरधर मालवीय, शास्त्रज्ञ अजय सोनकर
Web Title: Yogi Adityanath Swearing In Mukesh Ambani Adani Kangana Ranaut Kashmir Files Team Invited
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..