
मविआ म्हणजे खाऊंगा भी और खानेवालो की रक्षा भी करुंगा; अमृता फडणवीसांची टीका
नागपूर: देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या स्वतंत्र मतांसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या गायकीच्या माध्यमातून त्या सातत्याने आपल्या चाहत्यांसमोर येत असतात. त्यांच्यावर या गायकीवरुन ट्रोलही केलं जातं मात्र, त्या मागे न हटता सातत्याने आपल्या मतांवर ठाम राहिलेल्या दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक केंद्रीय यंत्रणांचे छापे मंत्र्यांच्या, तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर पडत आहेत. राज्यातील या वातावरणावर त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
हेही वाचा: रशियाविरोधात जगभर निषेध व्यक्त करण्याचं झेलेन्स्कींचं आवाहन
अमृता फडणवीस नेहमीच ठाकरे सरकारवर टीका करताना दिसून येतात. यावेळीही त्यांनी टीका केली आहे. महाविकास आघाडी म्हणजे खाऊंगा भी, खाने भी दूंगा और खानेवालो की रक्षा भी करुंगा, असं झाल्याची टीका त्यांनी केली आहे. कोणत्याही द्वेषापोटी कारवाई होत नाहीये. महाराष्ट्रात प्रगतीचं राजकरण व्हावं, असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा: "मुस्लिमांचा फक्त प्यादं म्हणून वापर, हिंसा रोखण्यात सरकार अपयशी"
अमृता फडणवीस यांनी म्हटलंय की, महाराष्ट्रात आता जे राजकारण सुरु आहे, जी परिस्थिती आहे ती आहे, मै खाऊंगा भी, खाने भी दूंगा और खानेवालो की रक्षा भी करुंगा, हे बंद व्हायला हवं. महाराष्ट्रात आम्ही सगळे जे लोक आहोत, त्यांची एकच अपेक्षा आहे ती म्हणजे प्रगतीचं राजकारण व्हावं, भ्रष्टाचार बंद व्हावा. तर हा जो महाराष्ट्रातील नेत्यांचा विचार आहे की, मै खाऊंगा भी, खाने भी दूंगा और खानेवालो की रक्षा भी करुंगा, तो बंद व्हायला हवा. बाकी खाण्यात काही खा किंवा नको खाऊ त्याने काही होत नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.
हेही वाचा: महापालिकेत घोटाळेच घोटाळे! मुंबईला देण्याऐवजी लुटण्याचं काम सुरु: फडणवीस
दुसरीकडे, देवेंद्र फडणवीसांनी आज विधीमंडळामध्ये मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवला आहे. येत्या काही महिन्यांमध्येच मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर आधीच राजकारण तापलेलं असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभावर टीका करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार असून पालिकेला सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजत आहेत. मुंबईला देण्याऐवजी लुटण्याचं काम सुरु केलंय. (Devendra Fadnvis over BMC)
Web Title: Mahavikas Aghadi Means I Will Eat And I Will Protect The Eater Criticism Of Amruta Fadnavis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..