Operation Trident: पाकिस्तानला घरात घुसून मारलं त्याची आठवण करून देणारा 'आजचा दिवस' 

OPERATION TRIDENT
OPERATION TRIDENT

नवी दिल्ली: आज भारतीय नौदल दिवस (Indian Navy day) आहे. नौदल दिन आपल्या शौर्याची ओळख करून देऊन वीरगती मिळालेल्या शूर नौदल सैनिकांच्या आठवणीनिमित्ती केला जातो. दरवर्षी 4 डिसेंबरला नौदल दिन का साजरा केला जातो. या दिवशी 1971 ला पाकिस्तानला भारतीय नौदलाने युध्दात मोठा शह दिला होता.

पाकिस्तानी नौदलाच्या तळावर हल्ला-
आजपासून 49 वर्षांपुर्वी 4 डिसेंबर 1971 ला भारतीय नौदलाने पाकिस्तानात घूसून कराची (Karachi) नौदलाच्या तळावर हल्ला केला होता. पाकिस्ताने भारताच्या सीमाभागात हवाई हल्ला केल्याने भारतीय नौदलाने दिलेले हे सडेतोड उत्तर होतं. भारतीय नौदलाचा हा (Indian Navy) हल्ला इतका जबरी होता की पाकिस्तान यातून लवकर सावरू शकला नव्हता.  भारतीय नौदलाने या ऑपरेशनला 'ऑपरेशन ट्रायडंट' (Operation Trident) असे नाव दिले होते.

ऑपरेशन ट्रायडंट नेमकं काय होत?
1971चे भारत-पाक युद्ध सुरू होण्यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भेट घेण्यासाठी नौदल प्रमुख अॅडमिरल एसएम नंदा ऑक्टोबर 1971 मध्ये आले होते. नौदलाच्या तयारीबद्दल सांगितल्यानंतर नंदा यांनी पंतप्रधानांना विचारले होते की, नौदलाने जर कराचीवर हल्ला केला तर यात सरकारचा राजनयिक तोटा होईल का? 

यावर उत्तर देण्यापूर्वी इंदिरा गांधींनी नंदा यांच्या प्रश्नाला आक्षेप घेतला. तुम्ही हे का विचारत आहात, असा सवाल त्यांनी केला. नंदा म्हणाले की, 1965 मध्ये नौदलाला भारतीय सागरी सीमेबाहेर कोणतीही कारवाई न करण्यास सांगण्यात आले होते. इंदिरा गांधींनी थोडा थोडा विचार केला आणि इंग्रजीत म्हटले की, 'वेल एडमिरल, इफ देयर इज अ वार, देअर इज अ वार.' याचा अर्थ असा होतो की जर लढाई झाली तर लढाईच असेल. पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर नंदा आभार मानत म्हणाले, "मॅडम, मला माझं उत्तर मिळालं.

बंद लिफाफ्यांमध्ये हल्ल्याचे आदेश-
1971 रोजी भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. 4 डिसेंबरला झालेल्या हल्ल्यात भारताने चार पाकिस्तानी युद्धनौका बुडवल्या. कराची बंदरातील इंधनाचा साठ्याला मोठं नुकसान पोहचवलं होतं. या दरम्यान 500 हून अधिक पाकिस्तानी नौदलाच्या सैनिका मृत्युमुखी पडले असावेत असा अंदाज आहे. असे म्हटले जाते की, हल्ल्याचा आदेश बंद लिफाफ्यात नौदलाकडे आला होता.

भारताने INS निपत, आयएनएस निरघाट आणि आयएनएस वीर या तीन युद्धनौकांच्या मदतीने कराची बंदरावर हल्ला केला होता. भारताच्या युद्धनौका गुजरातमधील ओखा बंदरातून  दुपारी 2 वाजता पाकिस्तानला रवाना झाल्या होत्या. भारतीय नौदलाने पाकिस्तानचे PNS खैबर, पीएनएस शाह जहाँ आणि पीएनएस मुहाफिज यांना जलसमाधी दिली होती.

पाकिस्तानची 3 जहाजांना जलसमाधी-
ही पहिली अशी लढाई होती ज्या युध्दात जहाजविरोधी क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता. अवघ्या 4 क्षेपणास्त्रांसह भारताने पाकिस्तानी नौदलाची 3 जहाजे बुडवली होती. या कारवाईत भारताचे सर्व सैनिक सुखरूप होते. भारतीय जहाजे रात्री परत येत होते. त्यानंतरच पाकिस्तानच्या हवाई दलाने या हल्ल्याला प्रत्यूत्तर देताना अंधारात स्वत:च्या जहाजांवरच हल्ला केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com