Confession of a lover killed a loved one
Confession of a lover killed a loved oneTeam eSakal

एकतर्फी प्रेमातून पोलिसाच्या मुलीची हत्या; चार तास मृतदेहासोबत...

Crime News : प्रेमाला नकार मिळताच आरोपीने रचला कट
Published on

उत्तर प्रदेशाच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) एका विद्यार्थिनीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थीनीवर प्रेम करणाऱ्या एका युवकानेच या विद्यार्थिनीची हत्या केली आहे. या युवकाने त्याच्या दोन मित्रांसोबत मिळून ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या घडली असून, अतिशय निर्घूनपणे ही हत्या (Assassination) करण्यात आली.

Confession of a lover killed a loved one
तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग; 3 ठार, 5 जखमी

सोमनाथ नावाच्या एका विद्यार्थ्याचं या विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेम होतं. या तरुणाने आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर तरुणीने त्याला नकार दिला होता. यामुळे संतापलेल्या मुलाने कट रचून २९ डिसेंबरला भेटायला बोलावलं आणि नंतर मुलीला त्याच्या गाडीत बसवलं. आरोपीने मुलीला आधी ज्यूसमध्ये नशेच्या गोळ्या पाजल्या आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला.

Confession of a lover killed a loved one
मध्यरात्री घरात शिरलेल्या चोरट्यांनी महिलेच्या तोंडावर गोळ्या झाडल्या

चार तास मृतदेहासोबत फिरत होते आरोपी

त्याचवेळी विद्यार्थिनी रात्री ८ वाजेपर्यंत घरी न पोहोचल्याने नातेवाइकांनी तिला फोन केला असता अज्ञात व्यक्तीने फोन उचलला व मुलगी एका पुलाखाली पडलेली असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला रुग्णालयात दाखल केलं. तेथे तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपी अदयाप फरार आहे. आरोपींची चौकशी केल्यानंतर ते तब्बल चार तास ते मृतदेह सोबत घेऊन फिरत होते असं समजलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com