
हॉटेल कर्मचाऱ्याचा पर्यटकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गोव्यातली घटना
गोव्यातल्या एका रशियन पर्यटकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कर्नाटकमधल्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या तरुणाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (POCSO ACT)
हेही वाचा: अल्पवयीन मुलींवर करायचा बलात्कार; मुंबईतल्या नराधमाचं बिंग फुटलं!
गोवा पोलिसांनी सांगितलं की, दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडे एका रशियन पर्यटकाने तक्रार दिली की, ती अरंबोळ इथं राहायला होती, त्यावेळी तिच्या अल्पवयीन मुलीवर कोणीतरी लैंगिक अत्याचार केले आहेत. त्यानुसार आम्ही गुन्हा नोंदवला. आरोपीचं नाव रवी रमाणी असल्याचं कळतंय. तो त्याच हॉटेलमधला कर्मचारी आहे.
हेही वाचा: संतापजनक! बलात्कार करून महिलेची हत्या, मृतदेहावरही वारंवार बलात्कार
या घटनेनंतर आरोपी पळून गेला. पण पोलिसांनी तात्काळ एक टीम तयार करत त्याला शोधून काढलं. तो कर्नाटकातल्या गडाग जिल्ह्यातला आहे. त्याला पकडण्यात आलं आणि अटक करण्यात आली. आम्ही त्याचं नाव लैंगिक अत्याचार करणाऱ्यांच्या यादीत टाकलं आहे, असंही पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे.
Web Title: Youth Arrested On Charges Of Raping Russian Tourists Minor Daughter In Goa
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..