esakal | ग्रामस्थांनी केले झाडावर क्वारंटाईन...
sakal

बोलून बातमी शोधा

youth forced by villagers to quarantine in tree at assam

देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊननंतर अनेकांनी घरचा रस्ता धरला. प्रवासादरम्यान अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागले. पण, गावात गेल्यानंतरही अनेकांचा त्रास संपलेला दिसत नाही.

ग्रामस्थांनी केले झाडावर क्वारंटाईन...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

गुवाहटी (असाम) : देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊननंतर अनेकांनी घरचा रस्ता धरला. प्रवासादरम्यान अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागले. पण, गावात गेल्यानंतरही अनेकांचा त्रास संपलेला दिसत नाही. ग्रामस्थांनी एका युवकाला झाडावर क्वारंटाईन केले असून, संबंधित छायाचित्र व्हायरल झाले आहे.

नवरदेव वाजत-गाजत आला नवरीच्या दारात पण...

आमोष बासुमत्री असे क्वारंटाईन केलेल्या युवकाचे नाव आहे. तो तमिळनाडूमधील एका कंपनीत कामाला होता. पण, लॉकडाऊनमुळे कंपनी बंद असल्याने त्याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करत तो गावात दाखल झाला. गावात गेल्यानंतर त्याला ग्रामस्थांनी गावात येण्यापासून रोखले. त्याचा कोरोनाचा अहवालही निगेटिव्ह होता. पण, त्याला गावात येऊ दिले नाही. अखेर, त्याला गावाबाहेर क्वारंटाईन होण्यास सांगितले. गावाबाहेर असलेल्या एका झाडावर तो राहू लागला.

दारूड्याने नशेत काय प्रताप केला पाहा...

आसाम-अरुणाचल प्रदेश सीमेच्या जवळ असणाऱ्या गावाच्या बाहेरील बाजूस अंसापूरच्या ग्रामस्थांनी त्याला बांबूच्या झाडावर घर बांधून दिले आहे. त्यावर त्यांनी बासुमात्रीला क्वारंटाईन करून ठेवले. दरम्यान, बासुमात्रीने 'मी ट्री हाऊसमध्ये चार रात्री पूर्ण केल्या आहेत आणि आणखी 10 दिवस येथेच काढायचे आहेत. हे घराइतकेच सोयीचे नसले तरी पुढील 10 दिवस इतर गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी घालविण्यास मी तयार आहे,' असे त्याने म्हटले आहे.

loading image
go to top