esakal | Video: व्हेल माशाच्या पाठीवर बसून केली सफर
sakal

बोलून बातमी शोधा

youth jump on whale shark fish and riding in water video viral

एक युवक उडी मारून व्हेल माशाच्या पाठीवर बसला आणि समुद्रात सफर करू लागला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, धाडस आणि कौतुक अशा पद्धतीने नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

Video: व्हेल माशाच्या पाठीवर बसून केली सफर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दुबई: एक युवक उडी मारून व्हेल माशाच्या पाठीवर बसला आणि समुद्रात सफर करू लागला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, धाडस आणि कौतुक अशा पद्धतीने नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

...म्हणून गाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक युवक बोटीतून प्रवास करताना दिसत आहे. यावेळी समुद्रातील व्हेल मासे जाताना दिसतात. युवक माशाच्या पाठीवर उडी मारण्याचे प्रयत्न करताना दिसतो. उडी चुकू नये म्हणून एकदोन वेळा तो अंदाजही घेतो. अखेर उडी मारतो आणि माशाच्या पाठीवर जाऊन बसतो. मासाही त्याला ढकलून देण्याचा प्रयत्न करतो. पण, युवक माशाचे कल्ले पकडून त्याच्यावर नियंत्रण मिळवतो आणि माशाच्या पाठीवर बसून प्रवास करतो. संबंधित व्हिडिओ 16 ऑगस्ट रोजी व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी युवकाच्या धाडसाचे कौतुक केले आहे तर काहींनी टीकाही केली आहे. पण, अनेकजण व्हिडिओ पाहाताना दिसतात.

शवगृहात ठेवलेला मृतदेह उठून बसला अन् लागला पळू...

loading image
go to top