युट्यूब पाहून प्रेयसीचा गर्भपात करायला गेला अन्...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 मार्च 2020

युट्यूब वरील व्हिडिओ पाहून प्रेयसीचा गर्भपात करायला गेला. पण, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रेयसी सध्या व्हेंटीलेटरवर असून, तिची प्रकृती गंभीर आहे.

चेन्नई: युट्यूब वरील व्हिडिओ पाहून प्रेयसीचा गर्भपात करायला गेला. पण, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रेयसी सध्या व्हेंटीलेटरवर असून, तिची प्रकृती गंभीर आहे.

दरवाजातून नको ती अवस्था सर्वांनीच पाहिली...

पोन्नेरी येथे राहणाऱ्या 27 वर्षीय युवकाचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये शारिरीक संबंध आल्यामुळे मुलगी गरोदर राहिली. कुटुंबियांना कळू नये म्हणून युवकाने युट्यूबवरील व्हिडिओ पाहून गर्भपात करण्याचे ठरवले. गर्भपातासाठी लागणारे साहित्य त्याने जमा केले. प्रेयसीला घेऊन त्याच्या काजूच्या फॅक्टरीवर गेला. तिथे त्याने गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. सर्जिकल साहित्याच्या सहाय्याने अर्भकाला बाहेर काढण्याऐवजी त्याने हाताने खेचायचा प्रयत्न केला. पण, गर्भपाताचे वैद्यकीय ज्ञान नसल्यानेमुळे त्याला समजत नव्हते. बाळाचे डोके हाताला लागले असे वाटत असतानाचा त्याने अर्भकाचा हात धरला आणि जोरात ओढला. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. प्रेयसीची अवस्था पाहून तो घाबरला. प्रेयसीला रक्ताच्या थारोळ्यातून उचलून दुचाकीवरून स्थानिक रुग्णालयात गेला. मात्र, मुलीची अवस्था पाहून चेन्नईतील रोवापुर्रम रुग्णालयात हलविण्यात सांगितले. शिवाय, त्याने डॉक्टरांना केलेल्या प्रकाराबद्दल सांगितल्यानंतर डॉक्टरांना धक्काच बसला. सध्या मुलीची प्रकृती गंभीर असून, ती व्हेंटीलेटरवर आहे.

मैत्रिणीला फिरायला घेऊन इटलीला गेला अन्...

दरम्यान, मुलीच्या पालकांना कळवल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी युवकाविरोधात पोक्सो अंतर्गत विविध गुन्हे दाखल केले आहेत. युवकाला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हनिमूनच्या रात्री पत्नी लागली तडफडायला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth tried to remove foetus after watching youtube video at chennai