Crime News: लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या YouTuber जोडप्याने अचानक संपवलं जीवन....; नेमकं काय घडलं?

Crime News: दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील बहादूरगडमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका यूट्यूबर कपलने एका उंच इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
Crime News
Crime NewsEsakal

Crime News: दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील बहादूरगडमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका यूट्यूबर कपलने एका उंच इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. २५ वर्षीय गरवित सिंग गॅरी आणि २२ वर्षीय नंदिनी कश्यप अशी मृत जोडप्याची नावे आहेत. हे दोघेही उत्तराखंडमधील डेहराडून येथील रहिवासी होते. काही दिवसांपूर्वीच दोघेही या इमारतीतील फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला आले होते.

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, झज्जर जिल्ह्यातील बहादूरगड येथील रुहिल रेसिडेन्सी सोसायटीत राहणाऱ्या एका जोडप्याने शनिवारी सकाळी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गरवित आणि त्याची लिव्ह-इन पार्टनर नंदिनी युट्यूबवर होते. ते स्वतःचे चॅनल चालवायचे आणि त्यासाठी शॉर्ट फिल्म्सही बनवायचे. काही दिवसांपूर्वीच हे दोघेही आपल्या क्रू मेंबर्ससह डेहराडूनहून बहादूरगडला आले होते. त्यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावर एक अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. ते पाच मित्रांसह राहत होते.

Crime News
Railway: आता करा दुर्गंधीमुक्त प्रवास, रेल्वे आणि परिसर स्वच्छ ठेणव्यासाठी होणार नव्या तंत्रज्ञानाचा वापर

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले की, शूटिंगनंतर हे जोडपे शुक्रवारी रात्री उशिरा घरी परतले होते. दोघांमध्ये काही मुद्द्यावरून वाद झाला, त्यानंतर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोघांनीही इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून खाली उडी मारली. पोलिसांनी सांगितले की, या जोडप्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Crime News
Salman Khan Firing: मुख्यमंत्री शिंदेंचा थेट सलमान खानला फोन, 'गॅलेक्सी'बाहेर झाला होता गोळीबार.. काय झाली चर्चा?

त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचे तपास अधिकारी जगबीर सिंग यांनी सांगितले की, कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. आम्ही घटनेचा तपास करत आहोत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळ गाठून पुरावे गोळा केले. सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

Crime News
BJP and Congress workers clash: टीव्ही डिबेट शोमध्ये काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, अनेक जण जखमी; व्हिडिओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com