
चंदीगड (पंजाब): पंजाबमधील पोलिस अधिकारी हरजीत सिंग यांच्यावर काही दिवसांपूर्वी माथेफिरूंनी हल्ला केला होता. यामध्ये त्यांना हात गमवावा लागला होता. मात्र, त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने या पोलिस अधिकाऱयाला कडक सॅल्यूट ठोकला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 12 एप्रिलला पटियाला येथे नाकाबंदीदरम्यान पोलिसांवर तलवारीने हल्ला झाला होता. यावेळी हरजीत सिंग यांना हात गमवावा लागला होता. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी टीका केली होती. हल्ल्यानंतर पोलिसांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हरजीत सिंग यांच्यावर चंदीगड येथील पीजीआय हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली. उपचारानंतर हरजीत सिंग यांचा सॅल्यूट करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. कोरोना व्हायरसच्या संकटात हरजीत सिंग हे सर्वांसाठी वीरतेचे प्रतिक बनले आहेत.
पंजाबमधील अनेक सेलिब्रेटी हरजीत सिंग यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहताना दिसत आहेत. आपले आयुष्य संकटात घालून हे पोलिस नागरिकांचे संरक्षण करत आहेत, त्यांना आपल्या सहकार्याची गरज आहे, असे आवाहन सेलिब्रेटिंकडून करण्यात येत आहे. युवराज सिंगनेही एक व्हिडीओ पोस्ट करून हरजीत सिंग यांना सलाम ठोकला आहे. युवराज सिंगही या व्हिडीओसह #MainBhiHarjeet Singh या चळवळीत सहभागी झाला आहे.
युवराज सिंग म्हणाला, 'हरजीत सिंग यांचे धाडस आणि दृढनिश्चय देशातील अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे. निःस्वार्थ सेवा करणाऱ्या या पोलिसांचे खूप-खूप आभार. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.