Video: डाळ-भात काय देता चिकन तंदुरी द्या...

will not eat food meant for the sick give chicken and fish tandoori at bhopal
will not eat food meant for the sick give chicken and fish tandoori at bhopal

भोपाळ (मध्य प्रदेश): डाळ-भात खाऊन आता कंटाळा आला आहे. डाळ-भात नको तर चिकन-तंदुरी द्या, अशी मागणी कोरोणा बाधित रुग्णाने केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ चिरायू रुग्णालयातील आहे. या व्हिडीओत कोरोना बाधित रुग्ण दिसत आहे. तो दिलकुशा येथील रहिवासी असल्याचे सांगतो. एवढे दिवस डाळ-भात खाऊन माझ्या हिरड्या दुखत आहेत. मी वाघाचा बच्चा आहे, रोज मांसाहार करतो. त्यामुळे मला मांसाहार द्या, अशी मागणी त्याने केली आहे. शिवाय, पुढे म्हणाला की, 'हे खाणं उत्तम आहे. मी त्याला नावं ठेवत नाही. पण मी जोपर्यंत आजारी होतो, तोपर्यंत मी हे खाल्ले आहे. आता मी हे खाऊ शकत नाही. मला चिकन, मटन आणि मासे खायला द्या. माझ्या घरातूनच खाणं मागवा, मी तेच खाणं खाईन, असे म्हणून तो रुग्णालयातर्फे देण्यात आलेलं जेवण परत पाठवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.'

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोरोना बाधितांना रुग्णालयात दाखल करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. यावेळी रुग्णांना रुग्णालयाकडून जेवण दिले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com