

Zakir Naik’s IRF faces UAPA action as the Centre authorises states to restrict funds and seize assets linked to the banned foundation.
esakal
केंद्र सरकारने वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक याच्याविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली आहे. त्याच्या संस्थांवर पाच वर्षांची बंदी घातल्यानंतर आता त्याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि मालमत्तांवरही कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्याच्या (UAPA) कलम ७ आणि ८ अंतर्गत राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे झाकीर नाईक आणि त्याच्या संस्थांशी संबंधित निधी गोठवण्यासह मालमत्ता जप्त करण्याची कारवाई होऊ शकते.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा