Breakfast Updates: पाकिस्तानात ब्लॅकआऊट ते भारत बायोटेकचं स्पष्टीकरण, वाचा महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

Sunday, 10 January 2021

राज्यातील ठळक घडामोडी, देश-विदेशसह, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर 

1. मध्यरात्री अख्ख्या पाकिस्तानातील बत्ती गुल; #blackout ट्विटरवर ट्रेंड

पाकिस्तानमध्ये अचानकच अनेक शहरांमध्ये बत्ती गुल झाली होती. काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे पाकिस्तानमध्ये शनिवारी रात्री अचानकच एकावेळी वीज गेली. कराची, इस्लामाबाद, लाहोर, पेशावर आणि रावळपिंडीसहीत अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये वीज गेल्यामुळे अंधार पसरला. वाचा सविस्तर 

2. भारत बायोटेकच्या लशीमुळे स्वयंसेवकाचा मृत्यू? कंपनीने दिलं स्पष्टीकरण 

भारत बायोटेक लशीच्या ट्रायलदरम्यान (Bharat Biotech Vaccine Trial) भोपाळमधील एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला होता. यावर भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे. स्वयंसेवकाला लस ट्रायलसंबंधी सर्व नियम आणि अटींची माहिती देण्यात आली होती. वाचा सविस्तर

 

3. शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे बर्ड फ्लू पसरवण्याचा कट; भाजपचा आमदार बरळला 

कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या भाजपच्या आमदाराने एक वादग्रस्त विधान केले आहे. काही तथाकथित शेतकरी आंदोलन करत आहेत. हे तथाकथित शेतकरी कोणत्याही आंदोलनात भाग घेत नाहीयेत तर मोकळ्या वेळेत चिकन बिर्याणी आणि ड्रायफ्रूट्सचा आनंद घेतायत, असे वक्तव्य त्यांनी केलं आहे. वाचा सविस्तर 

 

4. कसा आणि कुठून आला बर्ड फ्लू? भारतात काय आहे धोका?

कोरोनानंतर आता देशात बर्ड फ्लूचा हाहाकार दिसून येतोय. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यानंतर आता महाराष्ट्रात हाय अलर्ट आहे. कावळा तसेच इतर अनेक स्थलांतर करणाऱ्या पक्षांच्या मृत्यूनंतर अनेक राज्यात व्हायरसच्या चाचणीसाठी नमूने पाठवण्यात आले आहेत. काय आहे हा रोग? कोरोनानंतर आता या विषाणूचा धोका आहे का? तोवर चिकन-अंडी खाणं सुरक्षित आहे ना?  वाचा सविस्तर 

5. अभिमानास्पद! 19 भारतीय महिला पायलटच्या पथकाने रचला इतिहास

एअर इंडियाच्या महिला पायलटच्या पथकाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. महिलांच्या पायलट टीमने उत्तर ध्रुवावरून जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या हवाई मार्गावरून जाण्यासाठी उड्डाण केलं आहे. या महिला अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोतून 16 हजार किमी अंतर पार करून 9 जानेवारीला बेंगळुरूत पोहोचल्या आहेत. वाचा सविस्तर
 

6. मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा म्हणत शिवसेनेचा आज गुजराती मेळावा

आज मुंबईत शिवसेनेचा गुजराती समाजासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अंधेरी-ओशिवरा येथील गुजरात भवनातील नवनीत हाँलमध्ये हा मेळावा सकाळी १० वाजता होणार आहे. या मेळाव्यात १०० गुजराती व्यापारी उपस्थित रहाणार आहेत. वाचा सविस्तर

7. रात्रीच्यावेळी झाला ६ बिबट्यांचा हल्ला; केला थेट वनमंत्री राठोड यांना फोन आणि सुस्त यंत्रणेला आली जाग 

दाढ खुर्द येथील एका वस्तीवर एक-दोन नव्हे, तर सहा बिबट्यांनी एकदाच हल्ला केला. शेळ्यांचा फडशा पाडला. त्याच वेळी कार्यकर्त्यांनी वनअधिकाऱ्यांना फोन केले, परंतु ते उचलले नाहीत. अखेर वनमंत्री संजय राठोड यांना रात्री 12 वाजता फोन केला. वाचा सविस्तर
 

8. "वाचवा होss लेकरांना वाचवा" जिवाच्या आकांतानं ओरडत होत्या माता; अखेर छकुल्यांच्या डोक्यावर पदर टाकून केला आक्रोश

जिकडे बघावे तिकडे काळा धुरच धूर दिसत होता, तर अतिदक्षता विभागाचे दार उघडताच साऱ्या परिसरात धूर झाला होता. ज्वाळा दिसत नसल्या तर आग मात्र या रुग्णालयात धुमसत होती. ज्या मायबापांची लेकरं या युनिटमध्ये दाखल होती, त्या माता लेकरांच्या आकांताने आउट बॉर्न युनिटच्या दिशेने धावत येत होत्या. वाचा सविस्तर

9. कोठेंचा "राष्ट्रवादी'त प्रवेश, पण सदस्यत्व नाहीच ! ताकदवान कोठे अस्वस्थ का? उद्धव ठाकरे म्हणाले, कारणे शोधा

सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकावला जावा, या उद्दिष्टपूर्तीसाठी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांना राष्ट्रवादीत आणले. तर आगामी विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची संधी देण्याचे मान्य केल्याची चर्चा आहे. वाचा सविस्तर

 

10. Facebook वरील मैत्री महागात; लग्नाच्या आमिषाने सातारच्या महिलेला लाखोंना गंडा; नाशिकातील एकावर गुन्हा 

फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर रायपूर (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील जयदीप गणपत खर्डे (वय 35) याने साताऱ्यातील एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवले. लग्नाचे आमिष दाखवत खर्डे याने त्या महिलेकडून सव्वापाच लाख रुपये उकळले. वाचा सविस्तर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breakfast Top latest 10 news pakistan blackout bharat biotech vaccine farmer protest bird flu bjp indian women pilots shiv sena gujrati bhandara incident