11th Admission : अकरावी प्रवेशाची पहिली विशेष फेरीत २५ हजार ९७३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

२७ जुलैपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत
11th fyjc special round merit list out 25973 seat allotted education
11th fyjc special round merit list out 25973 seat allotted educationsakal

पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतंर्गत पहिल्या विशेष फेरीत २५ हजार ९७३  विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये देण्यात आली आहेत. या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सहा हजार ८३२ विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी प्रवेश घेतला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ३२६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

11th fyjc special round merit list out 25973 seat allotted education
11th Admission Deadline : अकरावी तिसऱ्या फेरीच्‍या नोंदणीची उद्यापर्यंत मुदत

या अंतर्गत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आता पहिल्या विशेष फेरीतंर्गत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये दिली आहेत. यात १९ हजार ६८२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे, तर तीन हजार ४२४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.

11th fyjc special round merit list out 25973 seat allotted education
Nashik 11th Admission : रिक्‍त जागा 15 हजार, अर्जदार साडेपाच हजार; अकरावी प्रवेश फेरीत विशेष फेरीची उद्या यादी

प्रवेशाच्या विशेष फेरीपासून आरक्षण प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील. या फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत (ता.२७) प्रवेश घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करणे, रद्द करणे, नाकारणे ही प्रक्रिया देखील गुरुवारपर्यंत सुरू राहील. या फेरीत पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास अथवा प्रवेश नाकारल्यास, प्रवेश रद्द केल्यास संबंधित विद्यार्थ्यांना यापुढील कोणत्याही फेरीमध्ये प्रतिबंधित केले जाणार नाही.

11th fyjc special round merit list out 25973 seat allotted education
Mumbai-Pune Expressway : मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दुपारी 'या' वेळेत दोन तास बंद

तसेच पुढील फेरीसाठी नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू राहील. या फेरीनंतरही काही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकले नाहीत, तर त्यांच्या प्रवेशासाठी कार्यवाहीचे वेळापत्रक नंतर घोषित करण्यात येईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com