
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
SBI PO Recruitment 2020: स्टेट बँक ऑफ इंडियाने बँकेत नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक उत्तम संधी आणली आहे. एसबीआयने प्रोबेशनरी ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती काढली आहे.
यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रिक्त पदांचे तपशील, अधिसूचना आणि ऑनलाईन अर्जाबाबतची माहिती पुढे दिली आहे.
- SSB Recruitment 2020: सशस्त्र सीमा बलमध्ये १५२२ जागांची 'मेगा भरती'!
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ)
पदांची संख्या : 2000
वेतन : दरमहा 23,700 ते 42,020
आवश्यक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय किमान 21 आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावे. राखीव वर्गांसाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे.
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज सुरू : 14 नोव्हेंबर 2020
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 04 डिसेंबर 2020
प्राथमिक परीक्षेची तारीख : 31 डिसेंबर 2020, 02, 04 आणि 05 जानेवारी 2021
मुख्य परीक्षेची तारीख : 29 जानेवारी 2021
मुलाखत : फेब्रुवारी किंवा मार्च 2021
- Success Story: 'मुस्लिमांसाठी ही आहे रोल मॉडेल'; मुख्यमंत्री योगींनीही केलं कौतुक!
अर्ज फी :
एसबीआय पीओसाठी सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उमेदवारांसाठी अर्जाची फी 750 रुपये आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
महत्त्वाच्या लिंक्स :
SBI PO अधिसूचना 2020 साठी येथे क्लिक करा.
SBI PO अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
- एज्युकेशन जॉब्स संबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)