SSB Recruitment 2020: सशस्त्र सीमा बलमध्ये १५२२ जागांची 'मेगा भरती'!

SSB_Recruitment
SSB_Recruitment

SSB Recruitment 2020: गृह मंत्रालयाच्या सशस्त्र सीमा बाल (SSB) ने कॉन्स्टेबल पदासाठीच्या भरतीची ऑनलाईन अर्जांची मुदत वाढविली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसएसबीच्या अधिकृत संकेतस्थळावर २० डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज करू शकतात. दुर्गम भागातील उमेदवारांसाठी अंतिम मुदत २७ डिसेंबर २०२० आहे. 

विविध पदांसाठी १५२२ जागांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये ड्रायव्हर (फक्त पुरुष), प्रयोगशाळेतील सहायक, पशुवैद्यकीय, आया (फक्त महिला), सुतार, प्लंबर, पेंटर, टेलर, मोची, गार्डनर, कुक, वॉशरमन, नाई, सफाईवाला, जल वाहक (पुरुष & महिला) आणि गट-'सी' मधील वेटर (पुरुष) तात्पुरत्या स्वरुपाची विना-राजपत्रित या पदांचा समावेश आहे.  

SSBने कॉन्स्टेबल पदासाठीच्या भरतीची अधिसूचना २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२० दरम्यान रोजगार वृत्तपत्रात प्रकाशित केली आहे. २९ ऑगस्ट २०२० पासून SSB कॉन्स्टेबलचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.

निवड झालेले उमेदवार भारतात किंवा भारताबाहेर कोठेही सेवा देतील. SSB कॉन्स्टेबल भरतीविषयी अधिक तपशील जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि इतर तपशील जाणून घ्या : 

SSB कॉन्स्टेबल अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

SSB कॉन्स्टेबल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

महत्वाच्या तारखा :

SSB कॉन्स्टेबल अर्ज भरण्यास सुरु झाल्याची तारीख : २९ ऑगस्ट २०२०
SSB कॉन्स्टेबल अर्ज भरण्याची अंतिम तारीख : २० डिसेंबर २०२०
कॉन्स्टेबल : १५२२ पोस्ट

SSB कॉन्स्टेबल वेतन:

लेव्हल ३ - रु. २१७००-६९१००

SSB कॉन्स्टेबल पदांसाठी पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :

- कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) - दहावी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष आणि अवजड वाहन चालविण्याचा परवाना
- कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) - विज्ञानासह दहावी उत्तीर्ण. लॅब असिस्टंट कोर्समध्ये प्रमाणपत्र असावे
- कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) - दहावी किंवा मॅट्रिकची परीक्षा एखाद्या मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मुख्य विषय विज्ञानासह उत्तीर्ण.
- कॉन्स्टेबल (आया) - विज्ञानासह १० वी आणि रेडक्रॉस सोसायटीचे प्रथमोपचार प्रमाणपत्र किंवा Dai प्रमाणपत्र किंवा संबंधित क्षेत्रात १ वर्षाचा अनुभव.
- कॉन्स्टेबल (सुतार, प्लंबर, पेंटर आणि इतर) - मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित क्षेत्रात दोन वर्ष काम करण्याचा अनुभव किंवा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा आयटीआयमध्ये दोन वर्षाचा डिप्लोमा आणि चाचणीसाठी पात्र असणे आवश्यक. 

SSB कॉन्स्टेबल वयोमर्यादा :

कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) - २१ ते २७ वर्षे
कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) - १८ ते २५ वर्षे
कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) - १८ ते २५ वर्षे
कॉन्स्टेबल (आया) - १८ ते २५ वर्षे
कॉन्स्टेबल (सुतार, प्लंबर, पेंटर) - १८ ते २५ वर्षे
कॉन्स्टेबल (इतर) - १८ ते २३ वर्षे

SSB कॉन्स्टेबल निवड प्रक्रिया :

उमेदवारांची शारीरिक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी आणि कौशल्य चाचणी, तपशीलवार वैद्यकीय चाचणी, पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा आणि अंतिम निवड या पद्धतीने निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

SSB कॉन्स्टेबल भरती 2020 साठी अर्ज कसा करावा?
पात्र उमेदवार केवळ SSBच्या अधिकृत वेबसाइट http://www.ssbrectt.gov.in/ वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अर्जासाठी शुल्क:
- जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी - रु. १००/ -
- एससी, एसटी, माजी सैनिक आणि महिला उमेदवार - शुल्क नाही

- एज्युकेशन-जॉब्स संबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com