esakal | इन्कम टॅक्‍स डिपार्टमेंटमध्ये सरकारी नोकरीची संधी! दरमहा 1.42 लाख रुपये पगार
sakal

बोलून बातमी शोधा

Income Tax Department

इन्कम टॅक्‍स डिपार्टमेंटमध्ये नोकरीची संधी! दरमहा 1.42 लाख रुपये पगार

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

प्राप्तिकर विभागाने सरकारी नोकरीसाठी अर्ज मागविले आहेत.

सोलापूर : प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) सरकारी नोकरीसाठी (Government job) अर्ज मागविले आहेत. आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त यांनी मल्टी टास्किंग स्टाफ (Multi-tasking staff) (एमटीएस), आयकर निरीक्षक (Income tax inspector) आणि कर सहाय्यक पदांच्या क्रीडा कोटा (Sports quota) अंतर्गत भरतीची अधिसूचना अधिकृत संकेतस्थळावर जारी केली आहे. गुणवंत क्रीडापटू 25 ऑगस्ट 2021 पर्यंत अधिकृत वेबसाइट comeincometaxmumbai.in वर ऑनलाइन पद्धतीने आयकर भरती 2021 साठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेत एमटीएसची 64, कर सहाय्यकाची 83 आणि आयकर निरीक्षकांची 8 पदे भरली जाणार आहेत. (A notification has been issued for a government job in the Income Tax Department)

हेही वाचा: राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये 5858 लिपिकांची होणार भरती! अधिसूचना जारी

एमटीएसच्या पदांसाठी पात्रता

एमटीएसच्या पदांसाठी उमेदवार दहावी पास असावा. त्याच वेळी, प्राप्तिकर निरीक्षकाच्या पदांकरिता अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवीधर असणे आवश्‍यक आहे. कर सहाय्यकासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची समकक्ष पदवी प्राप्त करण्ये असणे आवश्‍यक आहे. प्रति तास 8,000 की- डिप्रेशनची डाटा एंट्री करण्याची गती असणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा: "पेट'च्या 644 जागांसाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ !

वर्यामर्यादा...

आयकर निरीक्षकासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे असावी. कर सहाय्यकासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे असावी. मल्टी टास्किंग स्टाफसाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्‍यक आहे. ही भरती जरी स्पोर्टस्‌ कोट्यातून केली जात असल्याने कोणत्याही खेळामध्ये राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू या पदांसाठी अर्ज करू शकतात.

loading image