Admission : कृषी अभ्यासक्रमांचे प्रवेशही होणार अभियांत्रिकीप्रमाणेच; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

राज्यातील कृषी महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करत अभियांत्रिकीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.
Admission
AdmissionSakal

पुणे - राज्यातील कृषी महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करत अभियांत्रिकीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर कृषी महाविद्यालयात रिक्त जागांची माहिती मिळणार आहे. त्याप्रमाणे त्याला पर्याय निवडता येणार आहेत.

यामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार असून, महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देता येणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजजमाध्यमांद्वारे ही माहिती दिली आहे. मात्र, हा बदल नेमका कोणत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. राज्यात सध्या सीईटी सेलमार्फत कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून, सोमवारी (ता. ३१) अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नोंदणी करतानाच विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयानुसार पसंतीक्रम भरून घेण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक फेरीसाठी निवड यादी प्रसिद्ध केली जाते. तर अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार प्रत्येक फेरीसाठी नव्याने पसंतीक्रम भरता येतात.

आता ही पध्दत कृषी अभ्यासक्रमांसाठीही राबविली जाणार आहे. कृषी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी असलेल्या महाविद्यालये किंवा संस्थांना खासगी कृषी विद्यापीठ स्थापण्यास परवानगी देण्यासंदर्भातही बैठकीत विचारविमर्श करण्यात आला. राज्यातील विविध कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, रोपवाटिका आदींच्या प्रश्नांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले आहे.

निर्णयाचे वैशिष्ट्ये -

- विद्यार्थी केंद्रित प्रवेश प्रक्रिया

- राखीव जागांचा लाभही विद्यार्थ्यांना मिळणार

- कृषी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत केंद्रीभूत पद्धतीनं राबविण्यात येणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com