esakal | नोकरीची संधी! AIIMS मध्ये प्राध्यापकांसह इतर पदांसाठी भरती; आजच करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

AIIMS Bhubaneswar

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भुवनेश्वरने 112 रिक्त प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत.

नोकरीची संधी! AIIMS मध्ये प्राध्यापकांसह इतर पदांसाठी भरती

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

AIIMS Bhubaneswar Recruitment 2021 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), भुवनेश्वरने 112 रिक्त प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. यात प्राध्यापकांची 36 पदे, अतिरिक्त प्राध्यापक 3, सहयोगी प्राध्यापक 8 आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या 65 पदांचा समावेश आहे. सध्या वेबसाइटवर अर्ज करण्याची कोणतीही प्रक्रिया उपलब्ध झालेली नाही. मात्र, AIIMS च्या aiimsbhubaneswar.nic.in या अधिकृत वेबसाइटवर कोणत्याही क्षणी जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते.

शैक्षणिक पात्रता : AIIMS ने वैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय दोन्ही उमेदवारांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. वैद्यकीय उमेदवारांकडे वैद्यकीय पदवी असणं आवश्यक आहे, तर वैद्यकीय नसलेल्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवणं गरजेचं आहे.

वयोमर्यादा : AIIMS ने प्राध्यापक आणि अतिरिक्त प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी 58 वर्षांची वयोमर्यादा निश्चित केलीय. 58 वर्षांवरील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकत नाहीत. या व्यतिरिक्त, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याचबरोबर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयाची सवलत दिली जाईल.

हेही वाचा: स्टाफ नर्स भरती परीक्षेचे Admit Card जारी

अर्ज फी : या पदांकरिता अर्ज करण्यासाठी 1000 रुपये फी निश्चित करण्यात आलीय. मात्र, SC / ST / PWBD / महिला उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

AIIMS Bhubaneswar च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, ऑनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी अर्ज फॉर्म आणि इतर आवश्यक कागदपत्रे The Assistant Administrative Officer, Recruitment Cell, All India Institute of Medical Sciences, Bhubaneswar, Sijua, Dumuduma, Bhubaneswar -751019 या पत्त्यावरती पाठवावीत, असे आवाहन करण्यात आलेय.

loading image
go to top